राज्यपालांविराेधात आंदोलन केल्याप्रकरणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल

राज्यपालांचे विराेधात आंदोलन करणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना महागत पडले. बेकायदेशीररित्या आंदोलन केल्याने मनपा अधिकाऱ्यांनी तक्रार न दिल्याने पाेलीसांनीच तक्रार करत पदाधिकाऱ्यांवर केला दाखल गुन्हा


प्रतिनिधी

पुणे : राज्यपाल भगतसिंह काेश्यारी यांनी औरंगाबाद येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संर्दभात एक वादग्रस्त वक्तव्य केले हाेते. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान राज्यपालांनी केल्याचे सांगत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पुण्यातील कार्यकर्त्यांनी पुणे मनपात २८ फेब्रुवारी राेजी आंदोलन केले हाेते. मात्र, पाेलीसांची परवानगी न घेता बेकायदेशीरपणे हे आंदोलन केल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांवर शिवाजीनगर पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला  आहे.Charges filed against NCP workers for protesting against the governor

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, प्रदीप देशमुख, विराेधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ, महेश हांडे, मृणाल वाणी, सुषमा सातपुते, बाळासाहेब बाेडके, विक्रम जाधव, याेगेश ससाणे, किशाेर कांबळे, सुनील बनकर यांच्यासह पक्षाच्या २५ ते ३० कार्यकर्त्यांवर सदर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

२८ फेब्रुवारी राेजी मनपाच्या पायऱ्यांवर आंदोलना करिता राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते जात असताना, त्यांना राेखले असता त्यांनी बंदी झुगारुन सदर अांदाेलन करत राज्यपाल यांचे विराेधात आंदोलन केले. दरम्यान, पुणे मनपाची इमारत ही मनपाच्या अखत्यारित असल्यामुळे पुणे मनपा कार्यालयातील संबंधीत अधिकाऱ्यांनी तक्रार द्यावी की पाेलीस विभागाने तक्रार द्यावी यासंर्दभात संभ्रम निर्माण झाला हाेता. मात्र, महापालिका अधिकाऱ्यांनी यासंर्दभात तक्रार न दिल्याने पाेलीसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. काेथरुड पाेलीस यासंर्दभात पुढील तपास करत आहे.

Charges filed against NCP workers for protesting against the governor

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात