आज 26 फेब्रुवारी आहे, बालाकोट एअरस्ट्राईकचा स्मृतिदिन. आज बालाकोट एअर स्ट्राईकची तिसरी वर्षपूर्ती आहे. या हवाई हल्ल्याने एकीकडे भारताच्या ताकदीचा झेंडा उंचावला, शत्रूराष्ट्राला आणि दहशतवाद्यांना भारतही जशास तसे प्रत्युत्तर देऊ शकते, हे दाखवून दिले. आज तिसर्या वर्धापननिमित्त भारतीय वीरांच्या शौर्य आणि साहसाची कहाणी पुन्हा जिवंत करत आहोत. Balakot Airstrike Indian Army Operation Bunder Breaks Terrorists Caucus
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : आज 26 फेब्रुवारी आहे, बालाकोट एअरस्ट्राईकचा स्मृतिदिन. आज बालाकोट एअर स्ट्राईकची तिसरी वर्षपूर्ती आहे. या हवाई हल्ल्याने एकीकडे भारताच्या ताकदीचा झेंडा उंचावला, शत्रूराष्ट्राला आणि दहशतवाद्यांना भारतही जशास तसे प्रत्युत्तर देऊ शकते, हे दाखवून दिले. आज तिसर्या वर्धापननिमित्त भारतीय वीरांच्या शौर्य आणि साहसाची कहाणी पुन्हा जिवंत करत आहोत.
26 फेब्रुवारी 2019 रोजी भारताने पाकिस्तानातील बालाकोटमध्ये प्रवेश करून जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे अड्डे उद्ध्वस्त केले. आता प्रश्न पडतो की भारताला असे का करावे लागले? वास्तविक, या हल्ल्यामागचे कारण 14 फेब्रुवारी 2019च्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात दडलेले आहे. जेव्हा दहशतवाद्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये सर्वात मोठा हल्ला केला होता. पुलवामा येथील अवंतीपोराजवळ सीआरपीएफच्या ताफ्यावर हल्ला करण्यात आला. ताफ्यातील एक बस बॉम्बने उडवण्यात आली. या हल्ल्यात 40 जवान शहीद झाले होते. या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी बालाकोट हवाई हल्ला करण्यात आला.
दहशतवादी हल्ल्यानंतर बदला घेण्यासाठी मोठ्या ऑपरेशनची आखणी सुरू झाली होती. नियोजनही छुप्या पद्धतीने करण्यात आले. अचानक भारतीय हवाई दलाचे तत्कालीन प्रमुख आर. के. एस. भदौरिया यांनी ऑपरेशनची तारीख जाहीर केली. 26 फेब्रुवारी ही तारीख निश्चित करण्यात आली होती. त्यामागील कारण म्हणजे या दिवशी लष्कराचा एअरो इंडिया शो संपत होता आणि परदेशी पाहुणे निघणार होते. हवाईदल प्रमुखांनी या संपूर्ण ऑपरेशनला ‘बंदर’ असा कोडवर्ड दिला होता.
अधिकाऱ्यांकडून आवश्यक सूचना मिळाल्यानंतर, भारतीय हवाई दलाच्या १२ मिराज 2000 लढाऊ विमानांनी २६ फेब्रुवारी २०१९ रोजी पहाटे ३:३० वाजता सीमा ओलांडून पाकिस्तानातील बालाकोट गाठले आणि दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर बॉम्ब वर्षावास सुरुवात केली. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे अनेक लपलेले ठिकाण होते तेथे बॉम्ब टाकण्यात आले होते. भारतीय हवाई दलाने हवाई हल्ल्यात सर्व तळ उद्ध्वस्त केले. हल्ल्याच्या वेळी तळांवर सुमारे 500 दहशतवादी उपस्थित असल्याची माहितीही मिळाली होती.
या कारवाईबाबत नियोजन करताना संपूर्ण गोपनीयतेची काळजी घेण्यात आली होती. नियोजनाशी संबंधित एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, यावेळी अधिकाऱ्यांचे मोबाईल फोन ठेवण्यात आले होते. सर्व संभाषण समोरासमोर झाले.
या हवाई हल्ल्यानंतर बरेच काही बदलले होते. एकीकडे पाकिस्तान आणि दहशतवाद्यांना भारताची ताकद कळून आली असताना, भारतात याबाबत विरोधी पक्षांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. सरकारकडून हवाई हल्ल्याचे पुरावे मागविण्यात आले. आजही यावर प्रश्न उपस्थित होत आहेत. दुसरीकडे, सकारात्मक परिणामाबद्दल बोलताना, या हवाई हल्ल्यानंतर दहशतवाद्यांचे कंबरडे मोठ्या प्रमाणात मोडले गेले. त्यानंतर देशात एकही मोठा दहशतवादी हल्ला झालेला नाही. आता कोणतीही चुकीची पावले उचलल्यास भारताकडून त्याला उत्तर मिळेल आणि त्याचे अधिक नुकसान सहन करावे लागेल, हे पाकिस्तान आणि दहशतवाद्यांनाही समजले असावे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App