विशेष प्रतिनिधी
झाशी : गुरु शिष्य परंपरेतून शिकण्याची आणि शिकवण्याची पद्धत आता बदलली. आज तुम्ही इंटरनेटवर घरबसल्या जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातून तबला वादन कला शिकू शकता. ही माहिती प्रसिद्ध तबलावादक अविनाश पाटील यांनी दिली आहे. Tabla playing training is now online worldwide Information about tabla player Avinash Patil
तरुण पिढीतील प्रसिद्ध तबलावादक अविनाश पाटील गेल्या अनेक वर्षांपासून ऑनलाइन पद्धतीने तबला शिक्षण देत आहेत. अविनाश पाटील पं. प्रमोद पाटील यांचे शिष्य आणि दिल्ली घराण्याचे प्रसिद्ध तबलावादक आहेत. त्यांना ही पदवी गंधर्व महाविद्यालयाच्या संगीत अलंकारमधून प्रथम श्रेणीत मिळाली. पुणे विद्यापीठाची एम.ए. तबला ही पदवी प्रथम श्रेणी आणि सुवर्णपदकासह पटकावली.
भारतातील विविध राज्यांसह अमेरिका, कॅनडा, लंडन, जर्मनी, अबुधाबी, दुबई, नायजेरिया, ऑस्ट्रेलिया या देशांतील अनेक विद्यार्थी ऑनलाइन तबला वादनाची कला शिकत घेत आहेत.
पाटील यांनी सांगितले की, अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ मिरज यांनी जगाच्या कानाकोपऱ्यातील विद्यार्थ्यांना तबल्याची परीक्षा देण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे तबला वाजवण्याची कला शिकून परीक्षा देणे सोपे झाले आहे.
भारतातील सर्व प्रमुख शहरांबरोबरच दुबई, अबुधाबी, नेदरलँड, जर्मनी, पोलंड, डेन्मार्क, स्वित्झर्लंड, स्कॉटलंड लंडन या शहरांमध्ये पाटील यांनी लक्षवेधी तबला सोलो वादनाने जगभरातील प्रेक्षकांची वाहवा मिळवली आहे. अधिक माहितीसाठी 8698503701 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App