राजस्थानच्या कोटा जिल्ह्यात रविवारी सकाळी एक मोठा अपघात झाला. ज्यामध्ये वऱ्हाड घेऊन जाणारी कार कोटाच्या नयापुरा कल्व्हर्टवरून चंबळ नदीत पडली. या अपघातात 9 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासन घटनास्थळी दाखल झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये वराचाही समावेश आहे. गाडी अनियंत्रित असण्याची अनेक कारणे सांगितली जात आहेत, ज्यामध्ये दारू पिऊन गाडी चालवणेही सांगितले जात आहे. पोलीस घटनास्थळी पोहोचून वाहन बाहेर काढण्याचे काम करत आहेत. Major accident Car crashed into river Chambal, killing nine people including Navradeva
वृत्तसंस्था
कोटा : राजस्थानच्या कोटा जिल्ह्यात रविवारी सकाळी एक मोठा अपघात झाला. ज्यामध्ये वऱ्हाड घेऊन जाणारी कार कोटाच्या नयापुरा कल्व्हर्टवरून चंबळ नदीत पडली. या अपघातात 9 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासन घटनास्थळी दाखल झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये वराचाही समावेश आहे. गाडी अनियंत्रित असण्याची अनेक कारणे सांगितली जात आहेत, ज्यामध्ये दारू पिऊन गाडी चालवणेही सांगितले जात आहे. पोलीस घटनास्थळी पोहोचून वाहन बाहेर काढण्याचे काम करत आहेत.
Rajasthan | 9 bodies have been recovered after a car fell into the Chambal river in Kota. Among those who have lost their lives including a groom were going to Ujjain for the wedding: Kota Police — ANI (@ANI) February 20, 2022
Rajasthan | 9 bodies have been recovered after a car fell into the Chambal river in Kota. Among those who have lost their lives including a groom were going to Ujjain for the wedding: Kota Police
— ANI (@ANI) February 20, 2022
वृत्तानुसार, वराच्या बाजूचे लोक पहाटे 5.30 वाजता सवाई माधोपूरहून निघून उज्जैनला (मध्य प्रदेश) जात होते. दरम्यान, कोटा येथील नयापुरा कल्व्हर्टवरून कार चंबळ नदीत पडली. कारमधील लोकांनी काच उघडण्याचा प्रयत्न केला, मात्र एकच काच उघडता आली, त्यामुळे कारमधील 7 जणांचा मृत्यू झाला, उर्वरित 2 जणांचे मृतदेह नदीत दूरवर गेले. सकाळी स्थानिक लोकांनी गाडी पाहिल्यानंतर पोलिसांना कळवण्यात आले, त्यानंतरच मदतकार्य सुरू करता आले.
पोलिस डायव्हिंग टीमने आतापर्यंत 9 मृतदेह बाहेर काढले आहेत, कारमध्ये आणखी कोणी व्यक्ती होती का याचा तपास पोलिस पथक करत आहे. सर्व मृतदेह एमबीएस रुग्णालयात ठेवण्यात आले आहेत. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी कार अपघाताबद्दल दु:ख व्यक्त केले आणि सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले, त्यांनी प्रशासनाला सर्वतोपरी मदत करण्याचे निर्देश दिले आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App