पंजाब विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यातील भाजप उमेदवारांच्या प्रचाराची धुरा सांभाळणार आहेत. 14 फेब्रुवारी रोजी पीएम मोदी पंजाब विधानसभा निवडणुकीसाठी पहिली सभा घेणार आहेत. पीएम मोदींच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. संयुक्त किसान मोर्चाने पंतप्रधान मोदींच्या पंजाब दौऱ्याला विरोध करण्याचा दावा केला आहे. PM Modi In Punjab Strict security arrangements for PM Modi’s meeting, Samyukta Kisan Morcha announces protest
वृत्तसंस्था
चंदिगड : पंजाब विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यातील भाजप उमेदवारांच्या प्रचाराची धुरा सांभाळणार आहेत. 14 फेब्रुवारी रोजी पीएम मोदी पंजाब विधानसभा निवडणुकीसाठी पहिली सभा घेणार आहेत. पीएम मोदींच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. संयुक्त किसान मोर्चाने पंतप्रधान मोदींच्या पंजाब दौऱ्याला विरोध करण्याचा दावा केला आहे.
जालंधरमध्ये होणाऱ्या या सभेसाठी पंजाब पोलिसांनी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे. इंग्रजी वृत्तपत्र द ट्रिब्यूनच्या वृत्तानुसार, सभेमध्ये 25 हजार लोकांच्या बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र, भाजपकडून या मेळाव्याला 40 हजार लोक पोहोचण्याची शक्यता आहे.
केंद्रीय मंत्री आणि भाजपचे पंजाब व्यवहार प्रभारी गजेंद्र सिंह शेखावत सुरक्षेच्या मुद्द्यावर पंजाब पोलिसांच्या संपर्कात आहेत. गजेंद्र शेखावत यांच्यासह पोलिसांनीही रॅली मैदानाची पाहणी केली. पीएम मोदींच्या सुरक्षेसाठी फुलप्रूफ प्लान तयार करण्यात आल्याचा दावा पोलिसांकडून केला जात आहे.
या सभेत 14 विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्ते आणि नेते पोहोचणार असल्याचा दावा भाजपकडून केला जात आहे. मेळाव्यात 400 बसेस पोहोचण्याची आशा भाजपने व्यक्त केली आहे.
दुसरीकडे, संयुक्त किसान मोर्चाने पंतप्रधान मोदींच्या पंजाब दौऱ्याला शांततेने विरोध करण्याचा दावा केला आहे. एसकेएमने म्हटले आहे की, त्यांचे नेते आणि कार्यकर्ते पीएम मोदी ज्या मार्गावर जातील त्यावर काळे झेंडे दाखवतील. केंद्र सरकारने दिलेली आश्वासने पूर्ण केली नसल्याचा आरोप एसकेएम करत आहे. गेल्या महिन्यात शेतकर्यांच्या आंदोलनामुळे पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेत कुचराई झाली होती. पीएम मोदी फिरोजपूरच्या सभेत सहभागी न होता दिल्लीला परतले होते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App