उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकांतील चुरस अतिशय वाढली आहे. राज्यात सत्ताधारी भाजप आणि समाजवादी पक्ष यांच्यात आरपारची लढत आहे. अलीकडेच, तीन मंत्री आणि आमदारांनी समाजवादी पक्षात प्रवेश केल्यानंतर, आता भाजपने अखिलेश यादव यांच्यावर पलटवार करत त्यांच्या कुटुंबात फूट पाडली आहे. Mulayam Singhs brother in law pramod gupta and Congress poster girl priyanka Morya joins BJP, Gupta says Akhilesh has imprisoned Netaji
वृत्तसंस्था
लखनऊ : उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकांतील चुरस अतिशय वाढली आहे. राज्यात सत्ताधारी भाजप आणि समाजवादी पक्ष यांच्यात आरपारची लढत आहे. अलीकडेच, तीन मंत्री आणि आमदारांनी समाजवादी पक्षात प्रवेश केल्यानंतर, आता भाजपने अखिलेश यादव यांच्यावर पलटवार करत त्यांच्या कुटुंबात फूट पाडली आहे. काल मुलायम सिंह यादव यांची धाकटी अपर्णा यादव यांनी भाजपमध्ये प्रवेश केला, आज मुलायम यांचे साडू प्रमोद गुप्ता यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
उत्तर प्रदेश: लखनऊ में कांग्रेस की पूर्व नेता प्रियंका मौर्य और समाजवादी पार्टी के पूर्व विधायक प्रमोद गुप्ता भाजपा में शामिल हुए। pic.twitter.com/6KoqMCZvFy — ANI_HindiNews (@AHindinews) January 20, 2022
उत्तर प्रदेश: लखनऊ में कांग्रेस की पूर्व नेता प्रियंका मौर्य और समाजवादी पार्टी के पूर्व विधायक प्रमोद गुप्ता भाजपा में शामिल हुए। pic.twitter.com/6KoqMCZvFy
— ANI_HindiNews (@AHindinews) January 20, 2022
प्रमोद गुप्ता यांनी आज लखनौमध्ये भाजपमध्ये प्रवेश केला. प्रमोद गुप्त हे समाजवादी पक्षाचे माजी आमदार आहेत. प्रमोद गुप्ता यांच्यासोबत काँग्रेसच्या माजी नेत्या प्रियांका मौर्य यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. पत्रकार परिषदेत प्रमोद गुप्ता यांनी समाजवादी पक्ष आणि अखिलेश यादव यांच्यावर जोरदार निशाणा साधला. नेताजींना कैदेत ठेवले असून त्यांना कुठेही जाऊ दिले जात नाही, असा आरोप त्यांनी केला.
प्रमोद गुप्ता म्हणाले, “पक्षात समाजवादी नसलेल्यांना प्राधान्य दिले जात आहे. मुलायमसिंह यादव यांना शिव्या देणाऱ्यांना प्राधान्य दिले जात आहे. खुद्द मुलायम यांचाही आदर केला जात नाही. 22 नोव्हेंबरला मुलायम यांच्या वाढदिवशी त्यांचा माईक कसा हिसकावण्यात आला ते आम्ही पाहिले.”
10 फेब्रुवारीपासून उत्तर प्रदेशातील 403 विधानसभा जागांसाठी सात टप्प्यांत मतदान सुरू होणार आहे. यूपीमध्ये 10, 14, 20, 23, 27 आणि 3 आणि 7 मार्च रोजी सात टप्प्यांत मतदान होणार आहे. तर 10 मार्च रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणूक आयोगाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यूपी, पंजाब, गोवा, मणिपूर आणि उत्तराखंडमधील विधानसभा निवडणुकीसाठी १५ जानेवारीपर्यंत कोणत्याही राजकीय रॅली आणि रोड शोला परवानगी दिलेली नाही.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App