नालासोपारा, वसई रोड येथील सौरभ बजरंगी सिंग (वय १९) याला ठाणे खंडणीविरोधी पथकाने जेरबंद केले.Young man arrested for selling fake Kovid certificate in Thane
विशेष प्रतिनिधी
मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने अनेक ठिकाणी कोविड प्रतिबंधक लसीच्या प्रमाणपत्राची आवश्यकता भासत आहे. नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे, असेही आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
दरम्यान कोरोना प्रतिबंधक लसीचा कोणताही डोस न घेता नागरिकांना अवघ्या ७०० रुपयांत दोन्ही डोस घेतल्याचे बनावट प्रमाणपत्र तयार करून विकणाऱ्या तरुणास अटक करण्यात आली आहे.
नालासोपारा, वसई रोड येथील सौरभ बजरंगी सिंग (वय १९) याला ठाणे खंडणीविरोधी पथकाने जेरबंद केले.त्याने अनेक नागरिकांना बनावट प्रमाणपत्र देत १५ हजार रुपये घेतले आहेत.
याबाबत राबोडीतील फजलुर रहेमान शेख यांनी ठाणे नगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवून सौरब सिंग याला अटक केली असून पुढील तपास खंडणीविरोधी पथकाचे पोलिस निरीक्षक एस. आर. हुबे हे करीत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App