वृत्तसंस्था
मुंबई : सध्या सारे जग ऑनलाइनच्या प्रेमात पडले आहे. ऑनलाइन खरेदी करण्याची परंपरा सुरु झाली. नव्या जमान्याचा हा ट्रेंड आहे. पण, अशा प्रकारे एक पिझ्झा एका आजीबाईंना चक्क अकरा लाख रुपयांना पडला. वाचून आश्चर्य वाटले असेल पण, ही वस्तुस्थिती आहे. कारण ऑनालाईन खरेदीच्या नादात आणि ऍप डाउनलोड केल्यानंतर त्यांची फसवणूक केव्हा झाली हेच त्यांना कळले नाही. A pizza fell for Rs 11 lakh; Senior woman cheated for online
मुंबईच्या अंधेरी येथील रहिवासी असलेल्या या आजीबाईंना ऑनलाइन पिझ्झा आणि ड्रायफ्रूट ऑर्डर केली होती. त्यासाठी त्यांनी पैसे पाठविले. पण, बिलापेक्षा अधिक रक्कम त्यांनी चुकून पाठवली. ती परत कशी मिळवायची ? या विवंचनेत त्या होत्या. त्यासाठी त्यांनी गुगलवर शोध घेतला.
तेव्हा ऑनलाइन रक्कम परत मिळविण्याची माहिती देणारा एक मोबाईल क्रमांक मिळाला. त्यावर त्यांनी संपर्क केला आणि येथेच घोळ झाला. तेव्हा त्यांना एक ऍप डाउनलोड करण्यास सांगितले. त्या ऍपवरून सायबर चोरट्यांनी त्यांचे बँक डिटेल, पासवर्डची माहिती घेतली.
नंतर १४ नोव्हेंबर ते १ डिसेंबर २०२१ दरम्यान त्यांच्या खात्यातून तब्बल ११ लाख रुपये गायब झाल्याचे त्यांना लक्षात आले. त्यापूर्वी म्हणजे त्यांनी गेल्या वर्षी जुलैमध्ये पिझ्झा आणि ड्रायफ्रूटसाठी ऑनलाइन ऑर्डर दिली होती. तेव्हा ९९९९ रुपये आणि ड्रायफ्रूटसाठी २९ ऑक्टोबर मध्ये १४९६ रुपये जादा दिले होते.
जादा दिलेली रक्कम त्या परत मिळविण्याचा प्रयत्न करत होत्या. या नादात त्यांनी ऍप डाउनलोड करून सर्व बँक माहिती आणि पासवर्डचा तपशील सायबर चोरांच्या हाती सोपविला. त्याचा त्यांना मोठा फटका बसला आहे. तक्रारीनंतर या प्रकरणाचा तपास आता सायबर पोलिस तपास करत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App