जलील यांना मराठी पाट्यांची काय ऍलर्जी आहे ? , रुपाली ठोंबरे यांची खोचक टीका

नुकत्याच शिवसेनेत प्रवेश केलेल्या पुण्यातील रुपाली ठोंबरे यांनीही इम्तियाज जलील यांच्यावर सडकून टीका केली आहे. What is Jalil’s allergy to Marathi boards? , Rupali Thombre’s sharp criticism


विशेष प्रतिनिधी

पुणे : काल राज्य सरकारने राज्यातील सर्व दुकानांवरील नाम फलक मराठीत करण्याचा निर्णय घेतला आहे.या निर्णयावरून ऑल इंडिया मजलीस ए इत्तेहाद्दूल मुस्लमिनचे खासदार इम्तियाज जलील यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली होती.

दरम्यान आता नुकत्याच शिवसेनेत प्रवेश केलेल्या पुण्यातील रुपाली ठोंबरे यांनीही इम्तियाज जलील यांच्यावर सडकून टीका केली आहे.रुपाली पाटील ठोंबरे म्हणाल्या की, “महाराष्ट्रात दुकानावर मराठी पाट्याची इम्तियाज जलील यांना काय ऍलर्जी आहे? माय मराठीला विरोध करून आणखी किती जलील होणार ?” असा सवाल उपस्थित करत त्यांनी खोचक शब्दांत टीका केली आहे.



खासदार इम्तियाज जलील नेमक काय म्हणाले होते

जेव्हा-जेव्हा निवडणुकाजवळ येतात तेव्हा तुम्ही मराठी बोर्ड, कर्नाटक सीमा विवाद, मराठी अस्मिता हे मुद्दे काढता, ही नौटंकी असल्याचं न समजायला लोक मुर्ख नाहीत. मराठी पाट्या लावून मराठी तरुणांना नोकऱ्या मिळणार का? हा एक मिलियन डाॅलरचा प्रश्न आहे, अशी खोचक टीका जलील यांनी महाविकास आघाडी सरकारवर केली आहे.

What is Jalil’s to Marathi boards? , Rupali Thombre’s sharp criticism

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात