प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या “उंची” मोजायचे काम सुरू आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील शरद पवारांवर टीका केल्यानंतर संजय राऊत यांनी शरद पवारांना सह्याद्रीची उपमा दिली आहे. महाराष्ट्रात शरद पवारांच्या रूपात एक राजकीय आणि सामाजिक कर्तृत्वाचा सह्याद्री आहे. बाकीच्या टेकड्या आहेत, असे वक्तव्य शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी केले आहे. तुम्ही पवारांवर बोलता. तुमचे राजकीय कर्तृत्व काय?, असा सवाल राऊत यांनी भाजपच्या नेत्यांना केला आहे.Former Chief Minister of Opposition Devendra Fadnavis has taken the news of Sanjay Raut’s statement
संजय राऊत यांच्या या वक्तव्याचा माजी मुख्यमंत्री विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी समाचार घेतला आहे. तुम्ही पवारांची उंची सांगता पण पंतप्रधान नरेंद्र मोदींविषयी बोलताना तुमची पात्रता काय आहे, याचा विचार केला आहे का? अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत यांचे वाभाडे काढले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे केंद्रात पक्की मांड ठोकून राजकारण करत आहेत. महाराष्ट्रात शरद पवारांनी महाविकास आघाडीचे जुगाड जमून आपल्या राजकारणाचे बस्तान पुन्हा बसवण्याचा प्रयत्न केला आहे. हे दोन्ही नेते आपापले राजकारण आपल्या पद्धतीने पुढे सरकवत असताना त्यांचे अनुयायी मात्र उंची आणि पात्रता या विषयांवरून पोपटपंची करून एकमेकांशी भांडत आहेत.
एकीकडे संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस यांचे वाक् युद्ध रंगलेले असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी पंतप्रधान मोदी आणि पोपट यांचा व्हिडिओ सादर करून या पोपटाने उत्तर प्रदेशातले बहुजन समाजाचे भाजपचे आमदार काय करणार हे भविष्य वर्तवले आहे असे ट्विट केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App