
पुणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पर्यटन स्थळं आहेत. त्यामुळे या ठिकाणी देखील पर्यटनासाठी पोलिस प्रशासनाकडून बंदी घालण्यात आली आहे.The famous Shaniwarwada in Pune is closed for citizens and tourists
विशेष प्रतिनिधी
पुणे : कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याने राज्यात पुन्हा एकदा कडक निर्बंध लागू केले आहेत. त्यात पर्यटन स्थळावर देखील नागरिकांना जाण्यास बंदी घातली आहे.पुणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पर्यटन स्थळं आहेत.
त्यामुळे या ठिकाणी देखील पर्यटनासाठी पोलिस प्रशासनाकडून बंदी घालण्यात आली आहे. पुढील आदेश येईपर्यंत याठिकाणी सर्वसामान्य नागरिकांना प्रवेशासाठी बंदी घालण्यात आली आहे.त्यामुळेच पुण्यातील शनिवारवाडा देखील पुढील आदेश येईपर्यंत बंद करण्यात आला आहे.
पुणे जिल्ह्यातील मावळ, मुळशी, हवेली, आंबेगाव, जुन्नर, भोर, वेल्हा तालुक्यात ऐतिहासिक वास्तू, गड-किल्ले, स्मारके, पर्यटनस्थळे, धरण असल्यामुळे पर्यटक मोठ्या संख्येने सुट्टीच्या दिवशी याठिकाणी येत असतात.त्यामुळे कोरोनासह ओमायक्रॉन विषाणूचा प्रसार होण्याची शक्यता जास्त आहे.म्हणून या परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पर्यटन स्थळांवर बंदी घालण्यात आली आहे.
The famous Shaniwarwada in Pune is closed for citizens and tourists
महत्त्वाच्या बातम्या
- कॉर्पोरेट्ससाठी आयकर रिटर्न भरण्यास मुदतवाढ , १५ मार्च अंतिम तारीख; सामान्य करदात्यांना सवलत नाही
- यवतमाळमध्ये ९६ किलो चंदन जप्त, एक आरोपी अटकेत
- शेतीपंपाचा वीजपुरवठा पूर्वसुचनेशिवाय खंडित करणे बेकायदा; वीज ग्राहक मंडळाचे अध्यक्ष प्रताप होगाडे
- ममतांपुढे माघार घेत विरोध ऐक्यासाठी पवारांनी पंतप्रधान पदावरचा दावा सोडलाय का??; राजकीय वर्तुळात चर्चा