अल्पसंख्यांकांसाठी भारत हा जगातील सर्वात सुरक्षित देश असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अल्पसंख्यांक समाजातील बहुतेक लोकांसाठी सर्वात जास्त स्वीकारलेले नेते आहेत. या समुदायाचा शासकीय नोकरीतील सहभाग वाढला आहे अशा शब्दांत केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले आहे.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : अल्पसंख्यांकांसाठी भारत हा जगातील सर्वात सुरक्षित देश असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अल्पसंख्यक समाजातील बहुतेक लोकांसाठी सर्वात जास्त स्वीकारलेले नेते आहेत. या समुदायाचा शासकीय नोकरीतील सहभाग वाढला आहे, अशा शब्दांत केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले आहे.
mukhtar abbas naqvi narendra modi news
नक्वी म्हणाले की, भारत धार्मिक अल्पसंख्यांकांबद्दल असहिष्णू झाल्याचे मत चुकीचे आहे. अल्पसंख्यांकांसाठी भारत हा सर्वात सुरक्षित देश असून त्याच्या सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक सक्षमीकरणासाठी काम करण्यात आले आहे. पंतप्रधान मोदी यांच्या शासनकाळात दरवर्षी या समुदायातील विद्यार्थ्यांना चार कोटींपेक्षा जास्त शिष्यवृत्ती दिली जात आहे. केंद्र सरकारच्या नोकरीतील अल्पसंख्यकांचा पूवीर्चा वाटा आता 4 टक्क्यांवरून 10 टक्क्यांच्या पुढे गेला आहे. केंद्रीय नोकरीमधील मागील तीन वर्षांतील आकडेवारी तपासल्यास ही बाब दिसून येईल. मोदी सरकारने भेदभावाचे वातावरण संपवले आहे.
नरेंद्र मोदी देशातील सर्वात मान्यताप्राप्त नेते असल्याने प्रत्येक योजनेचा अल्पसंख्यकांना तितकाच फायदा झाला आहे. या समुदायातील बहुतेक व्यक्ती पंतप्रधान मोदी, मोदी सरकार आणि समान संधी वातावरणाचे कौतुक करतात. याशिवाय जम्मू-काश्मीरमधील जिल्हा विकास परिषदेच्या (डीडीसी) निवडणुकीत सहभागावरून खोऱ्यात नागरिक लोकशाही प्रक्रियेत सहभाग घेण्यास उत्साही आहेत, असेही नक्वी यांनी सांगितले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App