बुलेट ट्रेनवर मेट्रो कारशेडची कुरघोडी ठाकरे – पवार सरकारला अशक्य


ठाकरे – पवार सरकार केंद्र सरकारला बुलेट ट्रेनची जागा मेट्रो कारशेडसाठी वापरून काटशह देणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. पण हे शक्य आहे का?

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : कांजूरमार्गच्या मेट्रो कारशेडच्या मुद्द्यावरून उच्च न्यायालयात लेखी माघार घ्यावी लागल्यानंतर ठाकरे – पवार सरकारने मेट्रो कारशेडसाठी वांद्रा – कुर्ला कॉम्प्लेक्समधली बुलेट ट्रेनच्या प्रस्तावित जागेची चाचपणी सुरू केल्याची बातमी आली आहे. ठाकरे – पवार सरकार केंद्र सरकारला बुलेट ट्रेनची जागा मेट्रो कारशेडसाठी वापरून काटशह देणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. पण हे शक्य आहे का?, तेवढी ठाकरे – पवार सरकारला संधी आहे का, याचा विचार केला असता तसे फार कमी घडण्याची शक्यता वाटते कारण…

thackeray – pawar govt trying to sabotage bullet train project

काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महत्त्वाकांक्षी प्रकल्पांच्या कामाचा आढावा घेताना संभाव्य अडथळ्यांची चर्चा केली होती. त्यात बुलेट ट्रेनचाही समावेश होता. केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी विकास प्रकल्प आणि योजनांमध्ये राज्यांनी अडथळे उत्पन्न करू नयेत. केंद्र सरकार विकास प्रकल्प मागे घेणार नाही. ते योजनाबर हुकूम वेळेत पूर्ण केले जातील, असा स्पष्ट इशारा मोदी यांनी होता.

त्यातही मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेन हा मोदींचा अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. ३४९ किलोमीटरच्या या मार्गापैकी ३२५ किलोमीटरचा मार्ग गुजरातमध्ये येतो. गुजरातमध्ये त्यासाठी जमीन अधिग्रहणाचे ८५ टक्के काम पूर्ण झाले आहे. परंतु, महाराष्ट्रात उरलेल्या २५ किलोमीटर मार्गासाठीच्या जमिनीपैकी राज्यात फक्त २५ टक्के जमीन अधिग्रहणाचे काम झाले आहे. हे काम संथ गतीने होत असले तरी गुजरातच्या बाजूचे बुलेट ट्रेनचे काम जलद गतीने पूर्ण करा, असे स्पष्ट आदेश मोदींनी दिले होते. यातूनच संभाव्य अडथळ्यांबाबत मोदी किती सजग होते, हे स्पष्ट होते.

thackeray – pawar govt trying to sabotage bullet train project

बुलेट ट्रेनच्या गुजरातकडच्या बाजूच्या कामाने वेग घेतला की ठाकरे – पवार सरकारने कितीही अडथळे आणले तरी २५ टक्के कामापुरतेच मर्यादित राहतात. त्यातच गुजरातकडचे काम पूर्ण होत आले की महाराष्ट्रातही त्यावरचा दबाव वाढू शकतो. त्यातून ठाकरे – पवार सरकारला नाइलाजाने का होईना काम पूर्ण करावे लागेल. कारण प्रकल्प अर्धवट सोडणार नाही, हे मोदींनी आगोदरच स्पष्ट केले आहे. त्यामुळे कितीही इगो क्लॅश झाले तरी जनतेला त्याचा परिणाम दिसेल, याची खात्री वाटते.

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात