विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी देशातील सहकारी साखर कारखानदारीसाठी गोड बातमी दिली आहे. गेल्या ३५ वषार्पासून कारखान्यांना भेडसावणाऱ्या प्राप्तीकर आकारणीचा प्रश्न निकाली निघाला आहे.Union Co-operation Minister Amit Shah announces sweet news to sugar mills
एफआरपी (रास्त व किफायतशीर भाव) पेक्षा अधिक ऊस दर देणाऱ्या साखर कारखान्यांना फरकावरील रकमेवर लागू केलेला सुमारे साडेनऊ हजार कोटी रुपयांचा प्राप्तीकर रद्द करण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे.
एफआरपी, एसएमपी (किमान वैधानिक मूल्य) पेक्षा अधिक ऊस दर दिलेल्या साखर कारखान्यांना प्राप्तीकर विभागाने नोटिसा धाडल्या होत्या. वाढीव फरकाची रक्कम म्हणजे नफा गृहित धरून त्यावर कर आकारणी करण्याचे धोरण प्राप्तीकर विभागाचे होते.
देशभरातील सहकारी साखर कारखान्यांना कर वसुलीच्या नोटीसा लागू झाल्याने प्रचंड नाराजी पसरली होती. गेली ३० वर्षे हा प्रश्न प्रलंबित होता. याप्रश्नी राज्यातील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला.
त्यानंतर केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांनी प्राप्तीकर विभागाला एफआरपी पेक्षा अधिक रकमेवरील प्राप्तीकर आकारणी योग्य नसल्याची सूचना केली होती. त्यावर गतवर्षी २५ ऑक्टोबर रोजी सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेशन (सीबीडीटी) विभागाने परिपत्रकाद्वारे सदर प्राप्तीकर आकारणीचा निर्णय मागे घेतला. तथापि त्यामध्ये सन २०१६ पासून लागू झालेल्या कराचा उल्लेख होता
पण त्यापूर्वी झालेल्या कर आकारणीबाबत साशंकता होती. पुन्हा एकदा केंद्रीय सहकार मंत्र्यांचा दरवाजा ठोठावला गेला. शहा यांच्या सूचनेनुसार ५ जानेवारी रोजी अपर सचिव सौरभ जैन यांनी सुधारित परिपत्रक काढून सर्व सहकारी साखर कारखान्यांचा फरकावरील रकमेवर लागू केलेला प्राप्तीकर रद्द केला आहे.
नव्या निर्णयामुळे एफआरपीपेक्षा जादा दरावरील आकारणी हा नफा नव्हे तर व्यावसायिक खर्च गृहीत धरला जाणार आहे. याच आधारे प्राप्तीकराचे दावे निकाली काढण्याची सूचना परिपत्रकांमध्ये आहे. त्यामुळे देशभरातील सहकारी साखर कारखान्यांसाठी सकारात्मक बातमी असून भाजपाच्या पाठपुराव्याला यश आले आहे, असे भाजपा प्रदेश प्रवक्ते, भीमा साखर कारखान्याचे अध्यक्ष धनंजय महाडिक यांनी सांगितले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App