पंजाबमध्ये पंतप्रधानांना दिल्लीत मुख्यमंत्री सहन होत नाही ना!!; मग काँग्रेस दलित मुख्यमंत्री जाहीर करून निवडणूक का नाही लढवत??


पंतप्रधानांच्या सुरक्षा व्यवस्थेत पंजाबमध्ये हेळसांड झाल्यानंतर त्यावर राजकारण अतिशय टोकाला पोहोचले आहे. एकीकडे पंजाब मध्ये गंभीर राजकीय कायदेशीर कारवाई करण्याच्या हालचाली तेज आहेत, तर दुसरीकडे याबाबतचे राजकारण जास्तीत जास्त घसरत चालले आहे…!!In Punjab, the Prime Minister does not tolerate the Chief Minister in Delhi !!; Then why Congress is not contesting elections by declaring Dalit Chief Minister

छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी तर अक्षरश: राजकीय आगीत तेल ओतल्यासारखे वक्तव्य केले आहे. पंतप्रधानांना पंजाब मध्ये दलित मुख्यमंत्री सहन होत नाही. त्यामुळे त्यांनी नौटंकी केली असल्याचा आरोप बघेल यांनी केला आहे. पंतप्रधानांच्या सुरक्षेशी जो “खिलवाड” झाला त्याबद्दल काँग्रेस अंतर्गत नेमकी भूमिका काय घ्यायची याबद्दलच वेगवेगळी मतमतांतरे दिसून येत आहेत. काँग्रेसने अधिकृत ट्विटर हँडल वरून पंतप्रधानांवरच भडीमार चालवला आहे, तर दुसरीकडे या संपूर्ण घटनेला 24 तास उलटून गेल्यानंतर सोनिया गांधी यांनी या प्रकरणाची दखल घेऊन पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांना फोन केला आहे. त्यांना सोनिया गांधींनी झापल्याचा बातम्या काही प्रसार माध्यमांनी दिल्या आहेत.



पण या सगळ्यांमध्ये वरकडी भूपेश बघेल यांनी केली आहे. या सगळ्या प्रकरणात त्यांनी दलित मुख्यमंत्र्याचा अँगल आणून राजकारण तापवण्याचा प्रयत्न केला आहे. किंबहुना पंजाब मध्ये राजकारणाचा भडका उडविण्याचा त्यांचा हेतू दिसतो आहे. वास्तविक पंतप्रधानांच्या सुरक्षेशी त्याचा कसा संबंध जोडता येतो?, हा प्रश्न पूर्णपणे वेगळा आहे. पण तरीही भूपेश बघेल यांच्यासारख्या मुख्यमंत्रीपदावरच्या व्यक्तीने दलित मुख्यमंत्री हा अँगल पंतप्रधानांच्या सुरक्षेशी जोडला आहे…!!

पण त्या पलिकडे जाऊन एक वेगळाच मुद्दा येथे उपस्थित होतो आहे. आता जर खरेच पंतप्रधानांना पंजाब मध्ये दलित मुख्यमंत्री सहन होत नसेल, तर मग काँग्रेसच का नाही पंजाब मध्ये चरणजीत चन्नी यांच्याच मुख्यमंत्रीपदाच्या नावावर शिक्कामोर्तब करून निवडणूक लढवत…?? खरे म्हणजे काँग्रेसला ही फार मोठी राजकीय संधी आहे. पंतप्रधानांना दलित मुख्यमंत्री पसंत नाही म्हणून काँग्रेसने दलित मुख्यमंत्री पसंत करून जर त्यांच्या नावावर निवडणूक लढवली तर मोठे यश मिळेल…!!

पण तरीदेखील काँग्रेसने मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर न करता सामूहिक नेतृत्वाखाली निवडणूक लढवण्याचा निर्णय घेऊन तो जाहीर देखील केला आहे आणि येथेच नेमके मोठे राजकारण शिजताना दिसत आहे…!! भूपेश बघेल यांनी पंतप्रधानांचे नाव घेऊन त्यांना दलित मुख्यमंत्री सहन होत नाही, असे वक्तव्य जरूर केले आहे. पण प्रत्यक्षात दलित मुख्यमंत्री नेमका कोणाला सहन होत नाही हे हे काँग्रेसने आपल्या राजकीय कृतीतूनच सिद्ध केले आहे…!! काँग्रेसने मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर न करता निवडणूक लढविणे हेच पक्षाला दलित मुख्यमंत्री नको असल्याचे निदर्शक आहे.

मग भूपेश बघेल यांनी पंतप्रधानांना दलित मुख्यमंत्री सहन होत नाही असे वक्तव्य करून टोचण्याचे खरे कारण काय आहे?? की “लेकी बोले सुने लागे” या म्हणीसारखे त्यांना काँग्रेस हायकमांडला आणि प्रदेश काँग्रेसच्या नेत्यांना टोचायचे आहे…?? यातली राजकीय वस्तूस्थिती अशी आहे की भूपेश बघेल यांना आपल्याच पक्षाच्या नेत्यांना टोचायचे आहे. पण असे थेट टोचता येत नाही म्हणून ते फक्त पंतप्रधानांचे नाव घेत आहेत.

शिवाय या विषयी संशय वाटण्याचे कारण म्हणजे काँग्रेसमध्ये अंतर्गत राजकीय लढाईचा इतिहास नेहमी असाच राहिला आहे. काँग्रेसचे एकमेकांना पाण्यात पाहणारे नेते सोयीनुसार जातीवादाची आणि गैरजातीवादाची भूमिका घेत आपले राजकारण खेळत असतात. कदाचित भूपेश बघेल यांच्यामार्फत स्वतः मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी हेच आपला “राजकीय पत्ता” काँग्रेस हायकमांडपुढे सरकवत नसतील ना…!!??, असाही रास्त राजकीय संशय या निमित्ताने कोणी व्यक्त करत असेल तर तो गैर मानता येणार नाही.

In Punjab, the Prime Minister does not tolerate the Chief Minister in Delhi !!; Then why Congress is not contesting elections by declaring Dalit Chief Minister

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात