पंतप्रधानांच्या सुरक्षेत त्रुटी : काँग्रेसची तिहेरी भूमिका; ट्विटरवर खिल्ली; पत्रकार परिषदेत “राजकारण नको”; सोनियांकडून २४ तासांनंतर दखल!!


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंजाब दौऱ्यात सुरक्षा व्यवस्थेत ढिलाई दाखविण्यात आली. त्याबद्दल काँग्रेसने दुहेरी नव्हे, तर तिहेरी भूमिका घेतली आहे. काल काँग्रेसने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर विविध ट्विट करून पंतप्रधानांच्या सुरक्षा व्यवस्था या विषयाची खिल्ली उडवली. अनेक तुलनात्मक ट्विट करून पंतप्रधान फिरोजपूरच्या रॅलीला का गेले नाहीत?, असे सवाल विचारले. 70000 खुर्च्या मांडल्या होत्या पण 700 लोक आले, असा दावा केला. राहुल गांधी यांना पोलीस ढकलत आहेत आणि पंतप्रधान मोदी यांचा ताफा एसपीजी सुरक्षा व्यवस्थेत उभा आहे, असे तुलनात्मक फोटो ट्विट केले. The triple role of Congress; Ridiculed on Twitter; At the press conference

पत्रकार परिषदेत आज काँग्रेसच्या वतीने राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी पंतप्रधानांच्या सुरक्षाविषयक गोष्टींवर राजकारण नको, अशी काँग्रेसची भूमिका मांडली. पण या सगळ्यामध्ये काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी, वरिष्ठ नेते खासदार राहुल गांधी आणि सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी पंतप्रधानांच्या सुरक्षेतील त्रुटी बाबत एकही ट्विट अद्याप केलेले नाही.

या संपूर्ण घटनेला 24 तास उलटून गेल्यानंतर सोनिया गांधी यांनी तिची दखल घेतली असून सोनियांनी पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांच्याशी फोनवरून बातचीत केली. कालच्या सर्व घटनेचा तपशील विचारला. त्यांना पंतप्रधान हे सर्व देशाचे आहेत त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेत त्रुटी राहता कामा नयेत. जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करा, असे आदेश सोनिया गांधी यांनी मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांना दिले. अर्थात ही माहिती स्वतः मुख्यमंत्र्यांनी वृत्तवाहिन्यांशी बोलताना दिली आहे. सोनिया गांधी यांनी या संदर्भातले ट्विट केलेले नाही. यातून काँग्रेसची पंतप्रधानांच्या सुरक्षेतील त्रुटी संदर्भातली तिहेरी भूमिका दिसून येते.

The triple role of Congress; Ridiculed on Twitter; At the press conference

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात