प्रकृती ठीक नसल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्याच्या हिवाळी अधिवेशनालाही उपस्थिती दर्शवली नाही.Devendra Fadnavis calls Rashmi Thackeray, inquires about Chief Minister Uddhav Thackeray’s health
विशेष प्रतिनिधी
मुंबई : भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काल राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचं रश्मी ठाकरेंशी बोलणं झाल्याची माहिती दिली आहे.यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले की , देवेंद्र फडणवीसांचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्याशी फोनवरुन संवाद झाला आहे.गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आजारी आहे.
अलीकडेच त्यांच्या मानेवर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.दरम्यान प्रकृती ठीक नसल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्याच्या हिवाळी अधिवेशनालाही उपस्थिती दर्शवली नाही.तसेच उद्धव ठाकरे सध्या घरीच आराम करत असून व्हिडिओ कॉन्फरन्सच्यामाध्यमातून ते बैठका आणि कार्यक्रमाला हजेरी लावत आहेत.अस देखील पाटील म्हणाले.
पुढे पाटील म्हणले की , उद्धव ठाकरे कोणालाही भेटू शकले नाही त्यामुळे प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी मातोश्रीवर फोन केला. उद्धव ठाकरे विश्रांती घेत असल्याने पत्नी रश्मी ठाकरेंनी फोन उचलला. दरम्यान फडणवीसांनी उद्धव ठाकरेंच्या प्रकृतीची विचारपूस करत कठीण प्रसंगात आम्ही तुमच्यासोबत आहोत अशी ग्वाही फडणवीसांनी दिली.
देवेंद्र फडणवीस आणि रश्मी ठाकरे यांच्यातील संवाद
देवेंद्र फडणवीस म्हणाले की , उद्धव ठाकरे हे आम्हा सगळ्यांचे चांगले मित्र आहे. हिंदुह्द्रयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे महाराष्ट्रावर खूप मोठे उपकार आहेत. महाराष्ट्राची संस्कृती कोणाच्या आजारपणावर टिंगळटवाळी करणारी नाही.तसेच मी ज्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघात वाढतो त्या हे शिकवलं जात नाही.
उद्धव ठाकरेंच्या तब्येतीला आराम पडो यासाठी मी रोज प्रार्थना करतो. त्यांच्या तब्येतीकडे पाहता विधानसभा, मंत्रालयाकडे येण्याचा त्यांनी हट्ट धरू नये.ठाकरे कुटुंबाचे आमच्यावर उपकार आहेत. आम्ही तुमच्या सोबत आहोत असं म्हटल्याचं
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App