BREAKING NEWS : GOOD DECISION-आता पोलिसांनाही Work From Home; महाविकास आघाडी सरकारचा कौतुकास्पद निर्णय


  • राज्यात आतापर्यंत 9510 पोलिस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली असून 123 जणांचा मृत्यू झाला आहे.
  • मुंबईत गेल्या 24 तासांत 71 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे.
  • यामुळे गृहमंत्रालयाने पोलिसांसाठी ‘वर्क फ्रॉम होमचा मोठा निर्णय घेतला आहे. BREAKING NEWS: GOOD DECISION- Now From Police Work From Home; Admirable decision of Mahavikas Aghadi government

विशेष प्रतिनिधी

मुंबई : राज्यात कोरोना वाढतआहे. त्यामुळे चिंता पुन्हा वाढली आहे. अशात गृहमंत्रालयाने मोठा निर्णय घेतला आहे. तो म्हणजे, खासगी कंपनीतील कर्मचाऱ्यांप्रमाणे आता राज्यातील पोलिसांना देखील ‘वर्क फ्रॉम होम’ (Work Form Home) करता येणार आहे. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मुंबईत ही महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे.महाविकास आघाडी सरकारने घेतलेला हा निर्णय खरोखरच कौतुकास्पद आहे.

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील काय म्हणाले?

मुंबईसह राज्यातील पोलिसांना देखील कोरोना व्हायरसचा सामना करावा लागत आहे. पोलिसांनी नागरिकांच्या सेवेसाठी 24 तास कर्तव्यावर हजर राहावे लागते. त्यामुळे त्यांना देखील कोरोनाचा संसर्ग होण्याची भीती जास्त आहे. मुंबईत गेल्या 24 तासांत 71 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. यामुळे गृहमंत्रालयाने पोलिसांसाठी ‘वर्क फ्रॉम होमचा मोठा निर्णय घेतला आहे. 55 वर्षांवरील पोलिस कर्मचाऱ्यांनी ड्यूटीवर येण्याची आवश्यकता नाही. ते वर्क फ्रॉम होम करु शकतात. याबाबत आदेश देण्यात आले आहेत. पोलिसांनी देखील कोरोना नियमांचे पालन करावे, असे आवाहन देखील गृहमंत्र्यांनी दिले आहेत.

BREAKING NEWS : GOOD DECISION- Now From Police Work From Home; Admirable decision of Mahavikas Aghadi government

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था