Breaking News: MHADA Exam-म्हाडा भरती परीक्षेचे सुधारित वेळापत्रक जाहीर ; जाणून घ्या कधी होणार परीक्षा


विशेष प्रतिनिधी

पुणे : म्हाडा परीक्षेचे सुधारित वेळापत्रक पुन्हा एकदा जाहीर झाले असून 7 फेब्रुवारी ते 9 फेब्रुवारी दरम्यान म्हाडा भरतीची ऑनलाईन परीक्षा होणार आहे. यापूर्वी 29 आणि 30 जानेवारीला ही परीक्षा होणार होती.वारंवार या परीक्षेचा गोंधळात गोंधळ सुरूच आहे. Breaking News: MHADA Exam- Revised schedule of MHADA recruitment exam announced; Find out when the exam will take place

मागच्या वर्षी घेण्यात येणाऱ्या म्हाडाच्या परीक्षेचा पेपर फुटल्याचे समोर आल्यानंतर ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. त्यानंतर सुधारीत वेळापत्रकानुसार ही परीक्षा 29 जानेवारी 2022 रोजी होणार होती. परंतु एमपीएससीच्या पोलीस निरिक्षक पदासाठीची परीक्षाही याच दिवशी म्हणजे 29 जानेवारी रोजी घेण्यात येणार असल्याने म्हाडा परिक्षा पुढे ढकलण्यात आली.



म्हाडा प्राधिकरणाची क्लस्टर 6 मधील सहाय्यक, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक, टंकलेखक या संवर्गासाठी 29 आणि 30 जानेवारी या दिवशी सहा सत्रांमध्ये परीक्षा होणार होती. परंतु, एमपीएससी आणि म्हाडा प्राधिकरणाच्या दोन्ही परीक्षा एकाच दिवशी येत असल्याने म्हाडा ऑनलाईन परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. परीक्षेचे सुधारीत वेळापत्रक म्हाडा संकेतस्थळावर जाहीर करण्यात आले आहे. शिवाय उर्वरित क्लस्टर मधील परीक्षा या नियोजित वेळापत्रकानुसार होतील.

Breaking News : MHADA Exam- Revised schedule of MHADA recruitment exam announced; Find out when the exam will take place

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात