
सकाळी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी देखील ट्वीट करत त्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली आहे. BJP leader Atul Bhatkhalkar infected with corona
विशेष प्रतिनिधी
मुंबई : राज्यात कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा राज्यात कठोर निर्बंध लावण्यात आले आहेत.दरम्यान मागील काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेत्यांसोबत राजकीय नेत्यांनाही कोरोनाने गाठले आहे.दरम्यान, आज(४ जानेवारी)सकाळी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी देखील ट्वीट करत त्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली आहे.
माझ्या कोरोना चाचणीचा अहवाल +ve आला आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आयसोलेशनमध्ये आहे. गेल्या दोन दिवसात माझ्या संपर्कात आलेल्यांनी चाचणी करून घ्यावी.
— Atul Bhatkhalkar (मोदी का परीवार) (@BhatkhalkarA) January 4, 2022
दरम्यान आज भाजप नेते अतुल भातखळकर यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे त्यांनी ट्वीट करत सांगितले आहे. “माझ्या कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आयसोलेशनमध्ये आहे. गेल्या दोन दिवसात माझ्या संपर्कात आलेल्यांनी चाचणी करून घ्यावी.” असे आवाहन करणारे ट्वीट अतुल भातखळकर यांनी केले आहे.