वृत्तसंस्था
सिंधुदुर्ग : एका हातात गम आणि दुसऱ्या हातात पोस्टर घ्या आणि महाराष्ट्रभर पोस्टर लावत फिरा”, असा टोला भाजपचे नेते, केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी पोस्टरबाजी करणाऱ्या शिवसैनिकांना लगावला आहे. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.Take gum in one hand and poster in the other, walk around Maharashtra to pest posters; Narayan Rane’s attack on Shiv Sainiks
ते म्हणाले, ” एखाद्याला शोधण्यासाठी पोलिस यंत्रणा असते. मात्र पोलिस यंत्रणा असताना यांनी पोस्टरबाजी केली. ते केवळ पोस्टर लावण्याच्या पात्रतेचेच असून त्यांना राज्यकारभार सांभाळण्याची पात्रता नाही.
ना राज्याचा ना बँकेचा.. कोणताही कारभार करण्याची पात्रता नाही. आता त्यांनी एका हातात गम आणि दुसऱ्या हातात पोस्टर घ्यावे, महाराष्ट्रभर पोस्टर लावत फिरावे.”देशाचे सहकारमंत्री अमित शाह यांची मी लवकरच भेट घेणार आहे.
बँकेच्या निवडणुकीदरम्यान पत्रकार मंडळी, पोलीस व्यवस्था आणि न्यायव्यवस्था यांच्याबद्दल मला कशाप्रकारचे अनुभव आले, याबद्दल मी त्यांना सर्व माहिती देणार आहे, असेही त्यांनी सांगितलं.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App