किर्तनकार शिवलीला पाटीलने आजारी असल्याने एका आठवड्यातच बिग बॉसच्या घरातून गेली.त्यावेळी विशालला अश्रू अनावर झाले होते.Vishal Nikam visits Shivlila; He said – this gift must have been made by Mauli himself!
विशेष प्रतिनिधी
पंढरपूर : ‘बिग बॉस मराठी ‘ हा शो चांगलाच गाजला आहे.दरम्यान प्रेक्षकांचे सगळ लक्ष या शोचा विजेता कोण ठरणार याकडे लागल होत.दरम्यान दोन दिवसापूर्वी या ‘बिग बॉस मराठी 3 ‘ चा विजेता विशाल निकम हा ठरला आहे. त्यामुळे सोशल मीडियावर त्याची चर्चा रंगली आहे.
विशाल निकमने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना विशालने लिहिले आहे की, “बिग बॉसच्या घरामध्ये मी बोललो होतो, पहिलं जर कोणाला भेटीन तर शिवलीला ह्यांना आणि बघा आज आमची भेट झाली ती सुद्धा मार्गशीर्ष महिन्यात….माऊलींच्या पंढरपुरात! ही भेट माऊलींनीच घडवून आणली असावी!
विशालने निकमने बिग बॉसच्या घरात दिलेला शब्द पाळला आहे. घरात असताना त्याचे शिवलीलासोबत खूप जमायचं.किर्तनकार शिवलीला पाटीलने आजारी असल्याने एका आठवड्यातच बिग बॉसच्या घरातून गेली.त्यावेळी विशालला अश्रू अनावर झाले होते. मात्र आज या घरातून बाहेर पडल्यानंतर विशालने शिवलीलाची भेट घेतली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App