प्रतिनिधी
जळगाव : प्राणघातक हल्ल्यानंतर राष्ट्रवादीच्या रोहिणी खडसे व एकनाथ खडसे यांची पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. घाबरवण्यासाठी माझ्यावर हल्ला केला मात्र मी घाबरणार नाही. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या रोहिणी खडसे खेवलकर यांच्यावर काल रात्री प्राणघातक हल्ला झाला. या हल्ल्यानंतर रोहिणी खडसे खेवलकर यांनी या हल्ल्याची आपबिती कथन केली आहे.
पत्रकार परिषदेत त्या म्हणाल्या की, तीन दुचाकीवरून सात जण आले यातील तीन जण हे शिवसेनेचे पदाधिकारी होते. एकाच्या हातात पिस्तूल, दुसर्याच्या हातात तलवार तर तिसऱ्याच्या हातात लोखंडी रॉड होता. मी कारमध्ये बसलेल्या बाजूने तिघे आले. एकाने माझ्यावर पिस्तूल रोखले व कारचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र दरवाजा उघडला नाही म्हणून हातात रॉड असलेल्या व्यक्तीने माझ्या जोराने हल्ला चढविला.
मलाच मारण्यासाठी हे तिघेजण आलेले असल्याचेही या वेळी रोहिणी खडसे म्हणाल्या. हा हल्ला मला घाबरविण्यासाठी होता मात्र मी या हल्ल्याने घाबरणारी नाही. मी महिलांच्या पाठीशी आहे. अशीच कायम उभी राहिल. बोदवड नगरपंचायतीत पासून सुरू असलेल्या राजकीय वैमनस्यातूनच वादातून शिवसेनेच्या पदाधिकार्यांनी हा हल्ला करणार्यांची नावेही यावेळी रोहिणी खडसे खेवलकर यांनी सांगितली. यात शिवसेना विधानसभा क्षेत्रप्रमुख सुनील पाटील, पंकज कोळी व छोटू भोई या तिघा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश असल्याचा आरोप खडसेंनी केला.
रोहिणी खडसे यांच्यावर हल्लाप्रकरणी अद्याप अटक नाही
रात्री रोहिणी खडसे यांच्या गाडीवर हल्ला झाल्याची तक्रार मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला आलेली आहे या घटनेचा तपास सुरू केला. लवकरच तपासात सर्व काही समोर येईल. या घटनेसंदर्भात मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला 307 व 25 याप्रमाणे गुन्हे दाखल झालेले आहेत. सध्या एकाही आरोपीला ताब्यात घेतले असून पोलीस तपास करत आहेत, अशी माहिती जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक प्रवीण मुंडे यांनी दिली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App