विशेष प्रतिनिधी
चेन्नई : आर्या फेम अभिनेता अल्लू अर्जुन आणि गीता गोविंदम फेम अभिनेत्री रश्मिका मंदाना या दोघांची प्रमुख भूमिका असणारा पुष्पा हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट चार भाषांमध्ये प्रदर्शित करण्यात आला होता. तर या चित्रपटाने रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे. पहिल्या आठवड्यात या चित्रपटाने एकुण 144 कोटी रुपयांची कमाई केली आहे.
Allu Arjun’s Pushpa movie earns Rs 144 crore, surpassing Spider-Man: No Way Home
स्पायडर मॅन : नो वे होम या चित्रपटाने भारतामध्ये 110 कोटींची कमाई पहिल्या आठवड्यामध्ये केली हाेती. या चित्रपटाला मागे टाकत पुष्पाने आपली विजयी घोडदौड चालू आहे ठेवली आहे. सुकुमारन हे या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना या दोघांनीही अतिशय उत्कृष्ट भूमिका या चित्रपटात साकारल्या आहेत.
द फॅमिली मॅन २ फेम अभिनेत्री समानथाचे बॉलीवूड पदार्पण
त्याचप्रमाणे साऊथ अभिनेत्री समांथा हिचे या सिनेमातील एक आयटम सॉंग देखील सध्या प्रचंड हिट ठरत आहे. ह्या आयटम सॉंग विरुद्ध पोलीस कम्प्लेन देखील करण्यात आली होती. तरीही निर्मात्यांनी हे गाणे प्रदर्शित केले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App