विशेष प्रतिनिधी
मुंबई: महिलांना संधी देण्यात टाटा कंपनी देशात भारी ठरली आहे. टाटा कन्सल्टन्सीमध्ये (टीसीएस) सध्या पावणेदोन लाखांहून अधिक महिला कर्मचारी काम करत आहेत. एकाच कंपनीत इतक्या मोठ्या प्रमाणात महिला कर्मचारी असल्याचा हा जागतिक विक्रम आहे.Tata Consultancy has the largest number of female employees
एका वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार,टीसीएस ही पहिली कंपनी आहे ज्या कंपनीने आतापर्यंत सर्वाधिक महिलांना कर्मचारी म्हणून नियुक्त केले. टीसीएसमध्ये मध्ये 1, 78,357 महिला आहेत. भारतातील अव्वल क्रमांकावर असलेल्या 500 कंपन्यांनी प्रत्येक कंपनीसाठी सरासरी १३,८०० कामगारांसह ६.९ दशलक्ष लोकांना नियुक्त केले.
या यादीमध्ये दुसरे स्थान इन्फोसिसने मिळविले आहे. इन्फोसिसमध्ये एकूण 2,59,619 कामगार आहेत, त्यापैकी 1,00,321 महिला कर्मचारी आहेत. यादीतील तिसरे स्थान विप्रोने मिळविले आहे. विप्रोमध्ये 72,000 महिला तंत्रज्ञ आहेत.
बँकिंग विभागाा आयसीआयसीआय बँक भारतातील सर्वोच्च महिला कर्मचारी नियुक्त करण्यात प्रथम स्थानावर आहे. बँकेत 31,059 महिला कामगार आहेत. 21,746 महिला कर्मचाऱ्यांसह एचडीएफसी बँकेचा दुसरा क्रमांक आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजने एकूण 2,36,334 कामगारांपैकी 19,561 महिलांची नियुक्ती केली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App