राज्यात आता ओमायक्रॉन रुग्णांची संख्या २८ वर पोहोचली आहे. मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूरमध्ये ओमायक्रॉनचे रुग्ण आढळले आहेत. BJP MLA fined Rs 200 for walking around without mask
विशेष प्रतिनिधी
मुंबई : राज्यावर ओमायक्रॉनचे संकट वाढत असून दिवसेंदिवस ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या वाढत आहे.राज्यात आता ओमायक्रॉन रुग्णांची संख्या २८ वर पोहोचली आहे. मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूरमध्ये ओमायक्रॉनचे रुग्ण आढळले आहेत. जनतेला या विषणुपसून बचाव करण्यासाठी मास्कचा वापर करा हे लोकप्रतिनिधींनी सांगायचं तर त्यांनाच याचा विसर पडल्याचे दिसून येत आहे.
राज्यातील अनेक नेत्यांच्या बैठका ,सभा किंवा विविध सोहळे होत असतात.दरम्यान ठिकाणी नेते विनामास्क फिरताना दिसून येतात. याचदरम्यान, मंत्रालयात बिनधास्तपणे विनामास्क भिरणाऱ्या भाजपच्या आमदारवर पोलिसांनी कारवाई केली आहे.चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांच्यावर ही कारवाई केली आहे.
मंत्रालयातुन बाहेर पडताना मास्क नसल्यानं ही कारवाई करण्यात आली. मंगेश चव्हाण यांना पोलीसांनी २०० रुपयांचा दंड ठोठवला. मंगेश चव्हाण हे चाळीसगावचे आमदार आहेत. मंगेश चव्हाण यांनीही नियम हे सर्वांना सारखेच असता असं सांगून ठोठावलेला दंड भरला.आमदारांवर कारवाई करणाऱ्या पोलीसांचं मंत्रालयात कौतुक होत आहे.
मुंबई: विना मास्क फिरणाऱ्या भाजपाचे आमदार मंगेळ चव्हाण यांच्यावर पोलीसांनी कारवाई केली. मंत्रालयातुन बाहेर पडताना मास्क नसल्यानं ही कारवाई करण्यात आली. मंगेश चव्हाण यांना पोलीसांनी २०० रुपयांचा दंड ठोठवला. आमदारांवर कारवाई करणाऱ्या पोलीसांचं मंत्रालयात कौतुक होत आहे. pic.twitter.com/W9EKjAWGSF — Lokmat (@lokmat) December 14, 2021
मुंबई: विना मास्क फिरणाऱ्या भाजपाचे आमदार मंगेळ चव्हाण यांच्यावर पोलीसांनी कारवाई केली. मंत्रालयातुन बाहेर पडताना मास्क नसल्यानं ही कारवाई करण्यात आली. मंगेश चव्हाण यांना पोलीसांनी २०० रुपयांचा दंड ठोठवला. आमदारांवर कारवाई करणाऱ्या पोलीसांचं मंत्रालयात कौतुक होत आहे. pic.twitter.com/W9EKjAWGSF
— Lokmat (@lokmat) December 14, 2021
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App