सोनिया – ममतांचे पवार मध्यस्थ…??; सहज आठवले ; समता, ममता जयललिता आणि वाजपेयींचे दूत जॉर्ज…!!


काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या 10 जनपथ या निवासस्थानी झालेल्या विरोधी पक्षांच्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांच्या सहभागी झाले होते. त्या बैठकीच्या मराठी माध्यमांनी दिलेल्या बातम्या पवारांना पंतप्रधान पदापर्यंत घेऊन गेल्या आहेत. पण हिंदी आणि इंग्रजी माध्यमांमध्ये आलेल्या वस्तुस्थिती निदर्शक बातम्यांमधून पवारांना ममता बॅनर्जी यांच्याशी यांची समजूत काढायला सोनिया गांधी यांना सांगितले आहे, असे समजते.Sharad pawar’s role in the opposition not different than that of George Fernandez, the NDA convener

इंडिया टुडेने दिलेल्या बातमीनुसार, सोनियांनी सर्व विरोधकांची बैठक घेऊन ममता बॅनर्जी यांच्यापर्यंत एक “राजकीय संदेश” पोचवला आहे की काँग्रेस हाच मुख्य विरोधी पक्ष आहे. त्याला वगळून विरोधी ऐक्याचे स्वप्न पाहणे राजकीय चूक ठरेल. ही बातमी काँग्रेसच्या नेत्यांच्या हवाल्याने देण्यात आली आहे. त्यामुळे ती वस्तुस्थितीच्याजवळ ही जाणारी आहे. त्याचवेळी ज्या १२ खासदार यांचे राज्यसभेतून निलंबन झाले आहे, त्यांच्यासाठी राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांच्याशी चर्चा करण्याची सूचना देखील सोनिया गांधी यांनी शरद पवार यांना केल्याची बातमी आहे.



या दोन्ही बातम्यांचा राजकीय अर्थ असा की शरद पवार हे आता सोनिया गांधी यांचे दूत म्हणून ममता बॅनर्जी आणि व्यंकय्या नायडू यांच्याशी चर्चा करणार आहेत. मराठी माध्यमांनी या बातम्यांचा अर्थ पवारांच्या भावी नेतृत्वाशी अर्थात पंतप्रधानपदाशी बादरायणी लावला आहे…!!

पण या निमित्ताने एक जुनी राजकीय आठवण झाली. केंद्रात अटलबिहारी वाजपेयी यांचे सरकार हे समता पक्ष, ममता बॅनर्जी आणि जयललिता यांच्या पाठिंब्यावर टिकले होते. त्यावेळी या तीनही पक्षांपैकी कोणीही रुसले की वाजपेयी हे त्यावेळचे संरक्षणमंत्री जॉर्ज फर्नांडिस की जे त्यावेळच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे अर्थात एनडीएचे निमंत्रकही होते, त्यांना या तीनही पक्षांकडे समजूत घालण्यासाठी पाठवायचे. त्यावेळची प्रसार माध्यमे जॉर्ज फर्नांडिस हे समता, ममता आणि जयललिता यांच्या नाकदुऱ्या काढायला चालल्याचे रसभरीत वर्णन करायचे. तिन्ही पक्षांची समजूत घालताना जॉर्ज फर्नांडिस यांना घाम फुटायचा. काही केल्या या तिन्ही पक्षांची समजूत पटायची नाही. शेवटी 13 महिन्यांत वाजपेयींचे सरकार कोसळले. जॉर्ज फर्नांडिस यांची शिष्टाई त्यापेक्षा अधिक कामी आली नाही, असे वर्णन त्यावेळी प्रसार माध्यमे करायची.

त्यातला वर्णनाचा तपशील बाजूला केला, तर सोनिया गांधी यांनी शरद पवार यांच्यावर सोपविलेली कामगिरी जॉर्ज फर्नांडिस यांच्याकडे असणाऱ्या कामगिरीपेक्षा फारशी वेगळी नाही, हे समजून येते.

फक्त फरक हा आहे, की त्यावेळी अटलबिहारी वाजपेयी हे पंतप्रधान होते. राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीए सत्ताधारी होती. भाजप सगळ्यात मोठा पक्ष होता, पण त्याला बहुमत नव्हते. आणि आज काँग्रेस हा विरोधकांमधला सगळ्यात मोठा पक्ष आहे. त्याला बहुमत असण्याचा प्रश्नच नाही. पण आपले सर्वात मोठा विरोधी पक्ष असल्याचे “राजकीय स्टेटस” टिकवण्यासाठी त्या पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी यांना ममता बॅनर्जी यांची “समजूत” काढण्यासाठी शरद पवार यांच्यासारख्या दूताला धाडावे लागत आहे. शिवाय १२ खासदारांचे निलंबन मागे घेण्यासाठी देखील पवारांसारख्या दूताला उपराष्ट्रपतींकडे पाठवावे लागत आहे. आता या कामगिरीमध्ये पवारांची शिष्टाई किती कामी येईल हे येणारा काळच ठरवेल. पण असे असले तरी मराठी माध्यमांनी या बातमीचे केलेले मूल्यमापन मात्र अचूक केले नाही, असेच म्हणणे योग्य ठरेल.

केवळ अतिरिक्त पवार प्रेमापोटी सोनिया गांधी यांच्या घरातल्या बैठकीची बातमी मराठी माध्यमांनी शरद पवार यांच्या पंतप्रधान पदापर्यंत नेऊन भिडवली आहे. त्यावेळी जॉर्ज फर्नांडिस हे मोठे नेते असले तरी ते पंतप्रधान झाले नाहीत हे नीट समजून घेतले पाहिजे…!! आणि 2024 मध्ये तर नेमके कोण पंतप्रधान होणार त्याचे भवितव्य अजून गुलदस्त्यातच आहे…!!

Sharad pawar’s role in the opposition not different than that of George Fernandez, the NDA convener

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात