विशेष प्रतिनिधी
जम्मू – जम्मू आणि काश्मिरमध्ये पूंच जिल्ह्यात सुरक्षा दलांच्या कारवाईत लष्करे तोयबाचा एक दहशतवादी मारला गेला. अबू जरारा असे या दहशतवाद्याचे नाव असून तो पाकिस्तानातील आहे.Terrorist killed in J and K
या दहशतवाद्याला पाकिस्तानात प्रशिक्षण दिले होते. त्याला राजौरी-पूंच परिसरात हल्ले घडविण्यासाठी पाठविण्यात आले होते. त्याचा खातमा केल्याने दहशतवादविरोधी मोहिमेत दलाला मोठे यश मिळाले. यावर्षी ठार झालेला हा आठवा दहशतवादी आहे.
बेहरामगला परिसरात दहशतवादी असल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती. त्यानंतर, दलाने या परिसराला वेढा घालून शोधमोहिम सुरू केली. यावेळी दहशतवाद्यांनी दलावर गोळीबार करत पलायन करण्याचा प्रयत्न केला. प्रत्युत्तरादाखल सुरक्षा दलाने केलेल्या गोळीबारात या दहशतवाद्याचा मृत्यू झाला.
सुरक्षा दलाने घटनास्थळावरून एके ४७ रायफल, चार काडतुसे, ग्रेनेड आणि भारतीय चलन जप्त केले. स्थानिकांच्या पाठिंब्यामुळे लष्कर व पोलिसांच्या संयुक्त पथकाकडून राजौरी-पूंच भागात अशा प्रकारची कारवाई सातत्याने केली जात आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App