विशेष प्रतिनिधी
दिल्ली : जसे 2022 हे नवीन वर्ष सुरू होत आहे, तसे बऱ्याच वस्तूंच्या किमती वाढताना दिसून येत आहेत. तर बऱ्याच वस्तूंच्या, गोष्टींच्या किंमती कमी देखील होत आहेत. तर 2021 नंतर नेटफ्लिक्स आणि अॅमेझॉन सबस्क्रिप्शनच्या नव्या किमतीदेखील आता समोर आलेल्या आहेत. नेटफ्लिक्सने सब्सक्रिप्शन रेट कमी केलेले आहेत तर अॅमेझॉन प्राईमने वाढविलेले आहेत. चला पाहुयात काय आहेत हे प्लॅन्स.
Netflix subscription rate goes down and Amazon Prime goes up, find out about new plans
स्टँडर्ड कंटेट आणि मोबाइल, टॅब्लेट स्क्रीन साठीचा महिन्याचा नेटफ्लिक्सचा प्लॅन आधी 179 रुपयांना यायचा. आता हा प्लॅन 149 रुपयांना मिळणार आहे.
मोबाइल, टॅब्लेट, टीव्ही आणि लॅपटॉपला सपोर्ट करणाऱ्या नेटफ्लिक्सचा महिन्याभरासाठीचा प्लॅन आधी 499 रुपयांना मिळायचा. तो आता 199 रूपयांना मिळणार आहे.
दोन लोक वापरू शकता, असा 2 स्क्रीन स्टँडर्ड नेटफ्लिक्सचा प्लॅन आता 499 रूपयांना मिळणार आहे. यामध्ये फुल एचडी कंटेंट आपल्याला पाहायला मिळेल. तर नेटफ्लिक्सचा प्रीमियर प्लॅन 649 रुपयांना मिळणार आहे. यामध्ये 4 स्क्रीन आणि अल्ट्रा एचडी विथ 4K सपोर्ट असा प्लॅन मिळणार आहे.
Netflix : आता मित्रांना पासवर्ड शेअर करणे होईल कठीण, व्हेरिकेशन होणार अनिवार्य
तर अॅमेझॉनचे मंथली सबस्क्रिप्शन प्लॅन 129 रुपयांना मिळायचे. त्याची किंमत वाढवून आता 179 रुपये इतकी झालेली आहे.
नेटफ्लिक्स तर्फे कोणताही तीन महिन्यांचा प्लॅन याआधी दिला जायचा नाही. पण अमेझॉनचा जो आधी 3 महिन्यांचा प्लॅन दिला जायचा त्याची किंमत होती 329 रुपये. तर आता ज्याची किंमत वाढून तो 459 रुपये इतका झाला आहे.
Amazon प्राइमचा वार्षिक प्लॅन 999 रुपयांमध्ये येत होता. त्याची किंमत वाढून आता 1,499 रुपये झाली आहे. Netflix द्वारे इयरली सबस्क्रिप्शन ऑफर केले जात नाही. परंतु मोबाईल सबस्क्रिप्शन प्लॅनसाठी एका वर्षात 1,788 रुपये द्यावे लागतील. जे Amazon Prime च्या वार्षिक सबस्क्रिप्शन प्लॅनपेक्षा सुमारे 289 रुपये जास्त महाग आहेत. त्याच Netflix चे मूळ वार्षिक बजेट रु. 2,388 आणि स्टँडर्ड प्लॅन रु. 5,988 आणि प्रीमियम प्लॅन रु. 7888 मध्ये येईल.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App