विशेष प्रतिनिधी
काशी : काशी विश्वनाथ धाम कॉरिडॉरच्या उद्घाटनाच्या निमित्ताने देशव्यापी विकासाचे जे मंथन होणार आहे, त्याची सुरुवात भाजपशासित सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या, उपमुख्यमंत्र्यांच्या आणि भाजपच्या महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीने होणार आहे.Kashi vishwanath corridor; PM Modi to hold meetings of all BJP chief ministers on good governance
या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वतः सहभागी होऊन गव्हर्नन्स अर्थात शासन व्यवस्था याविषयी सर्व मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना मार्गदर्शन करणार आहेत. या बैठकीत भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा, संघटन सरचिटणीस बी. एल. संतोष हे देखील सहभागी होणार आहेत.
भाजपशासित सर्व राज्यांचे मुख्यमंत्री 13 तारखेला दुपारपर्यंत काशीमध्ये दाखल होणार असून त्यानंतर दोन दिवस ते काशीवास करून राहणार आहेत. या काशीवासात सर्व मुख्यमंत्र्यांचे भरगच्च कार्यक्रम आहेत. परंतु त्यामध्ये ग्लॅमरपेक्षा बैठका, विकास कामांचे आराखडे आपापल्या राज्यांच्या धार्मिक पर्यटनाच्या विकास योजना या विषयीची प्रामुख्याने चर्चा आणि निर्णय अपेक्षित आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कार्यपद्धती सर्व बाजूंनी विचार करून वेगवान निर्णय घेणे ही आहे. त्यासंदर्भातले महत्त्वाचे मार्गदर्शन पंतप्रधान मोदी स्वतः या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना करणार आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य आणि डॉ. दिनेश शर्मा, उत्तराखंड मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग, गुजरात भूपेंद्र पटेल, हिमाचलचे मुख्यमंत्री जयराम ठाकुर, आसामचे मुख्यमंत्री हेमंत विश्वकर्मा कर्नाटकचे मुख्यमंत्री बसावराज बोम्मई, त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लव देव, तसेच अरुणाचल, बिहार मणिपूर या राज्यांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यामध्ये सहभागी होणार आहेत.
या राज्यांमध्ये जी विशेष महत्त्वाची धार्मिक स्थळे अथवा पर्यटन स्थळे आहेत त्यासंबंधींचा ठोस विकास आराखडा दोन – तीन धार्मिक – पर्यटन स्थळे एकमेकांना जोडणे, तेथील पायाभूत विकास योजना आखणे आणि त्याविषयीच्या महत्त्वाच्या निर्णयांचे मार्गदर्शन हे मुख्यमंत्र्यांचा काशी दौऱ्याचे सार असणार आहे!!
पंतप्रधान मोदी यांच्या समवेत सर्व मुख्यमंत्री हे गंगा आरतीमध्ये देखील सहभागी होणार आहेत. परंतु तो त्यांचा जाहीर कार्यक्रम आहे. त्यापेक्षाही महत्वाचा कार्यक्रम म्हणजे पंतप्रधानांसमवेतच्या बैठकीमध्ये विकास आराखड्यांबद्दल विशेषत्वाने चर्चा आणि निर्णय हा असणार आहे. त्यामुळे या सर्व राज्यांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सर्व तयारीनिशी काशीमध्ये दाखल होण्याची अपेक्षा आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App