विशेष प्रतिनिधी
ऑस्ट्रेलिया : ते म्हणतात ना, ऐकावे ते नवलच. हे कधी कधी खरं वाटतं. कारण या जगामध्ये अशा बऱ्याच चित्रविचित्र घटना बऱ्याच वेळा आपण पाहतो, ऐकतो, अनुभवतो. नुकताच इंटरनेटवर एका जुळ्या बहिणींचा किस्सा प्रचंड व्हायरल होतोय. या बहिणी जुळ्या आहेत. त्यांनी आयुष्यामध्ये जवळपास सर्व कामे एकत्र केलेली आहेत. अॅना आणि ल्युसी असे या दोघींचे नाव आहे. दोघी 35 वर्षांच्या आहेत. तर आता या दोघींनी असा निर्धार बांधला आहे की, दोघी एकाच वेळी मुलाला जन्म देतील. मागील 9 वर्षांपासून या दोघींचा एकच बॉयफ्रेंड आहे. ज्याचे नाव आहे बेन बिरने.
These twin sisters are trying to get pregnant at the same time, they have the same boyfriend
या दोघी जगातील मोस्ट आयडेंटिकल ट्विन्स आहेत. आपण दोघींनी एक सारखे दिसावे यासाठी दोघी सतत प्रयत्नशील असतात. त्या दोघींचे डाएट रुटीन ते एक्झरसाइज पॅटर्न देखील सेम आहेत. दोघींनी आजवर आपल्या दोन सर्जरी केलेल्या आहेत. ब्रेस्ट ट्रान्सप्लान्ट आणि आयब्रो सर्जरी ज्यामुळे त्या दोघी एकसारख्या दिसतील. अमेरिका येथील एका टेलिव्हिजन शोवर देखील या दोघी झळकल्या होत्या.
WATCH | ऐकावं ते नवलंच! या गावात राहण्यासाठी तुम्हाला काढून टाकावा लागतो शरिराचा अवयव
आता एकाच वेळी मुलांना जन्म द्यायचा तर त्या दोघींनी आपले ओव्हुलेशन टाईमचे निरीक्षण केले. त्यावेळी त्यांच्या लक्षात आले की दोघींचा ओव्हुलेटिंग पीरियड देखील सेम आहे. म्हणून त्या दोघींनी हा निर्धार केला आहे की एकाच वेळी आपण मुलांना जन्म देऊ.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App