विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : रेल्वेचे खाजगीकरण होणार नाही आणि अशा प्रकारची कोणतीही योजना भविष्यात राबवली जाणार नाही, असे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केले. पंतप्रधान आपल्याशी सतत रेल्वेबाबत चर्चा करतात आणि देशाच्या अर्थव्यवस्थेत रेल्वेच महत्व असल्याचे सांगतात असेही ते म्हणाले.Railways will not be privatized and there are no plans for the future, Railway Minister Ashwini Vaishnav said
एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना वैष्णव म्हणाले, जगातील कित्येक देश लहान गोष्टी मोठा ऐतिहासिक वारसा असल्याचे दर्शवून पर्यटनाला चालना देत आहेत. आपल्या देशाला समृद्ध ऐतिहासिक वारसा लाभला आहे. देशात प्राचीन किल्ले, मनमोहक पर्यटन स्थळ, आयुर्वेद आहे. या गोष्टी विदेशी पर्यटकांना दाखवणे आवश्यक आहे, असे वैष्णव यांनी सांगितले.
रामायण एक्सप्रेसच्या धर्तीवर बायबल, कुराण, गुरू ग्रंथसाहेब एक्सप्रेस सुरू केली जाणार का, या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी सांगितले की, रामायण एक्सप्रेस ही केवळ एक सुरुवात असून, भविष्यात काहीही होऊ शकते. देशाचे कित्येक पैलू आहेत. त्या प्रत्येक पैलूवर रेल्वे सुरू केली जाऊ शकते. नागरिकही या सर्वांचा आनंद घेत आहेत.
देशातील प्रत्येक शहराची अनोखी संस्कृती आहे. या संस्कृतीसोबत जुळणारी रेल्वे स्थानके उभारायची आहेत. याबाबत प्रवाशांना चांगला अनुभव यावा, हे लक्षात घेऊन रेल्वे स्थानकांची उभारणी केली जात आहे. आम्ही 40 मॉडेल रेल्वे स्थानके उभारत आहोत. यात कोणतेही राजकारण नाही. पुढच्या दोन ते तीन वर्षांत अशा प्रकारचे 250 ते 300 रेल्वे स्थानके आम्ही उभारणार आहोत, अशी माहिती अश्विनी वैष्णव यांनी दिली.
रेल्वेच्या माध्यमातून अर्थव्यवस्थेत बदल घडवून आणणे शक्य असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मत आहे, असे सांगून वैष्णव म्हणाले, चीन आणि युरोपसह जगभरात याची उदाहरणे आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी रात्री 11 वाजताही मला फोन करून या सर्व मुद्यांवर माझ्यासोबत चर्चा करतात. रेल्वे स्थानके पुढची 50 वर्षे ती टिकली पाहिजेत, हे डोळ्यासमोर ठेवून त्यांची उभारणी करीत आहोत, असे मोदी सांगतात. ते प्रत्येक मुद्यावर तपशीलवार चर्चा करतात.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App