विशेष प्रतिनिधी
मुबंई : शाहरुख खान, दीपिका पदुकोण, जॉन अब्राहम यांची प्रमुख भूमिका असणाऱ्या पठाण या चित्रपटाचे चित्रीकरण लवकरच सुरु होणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मधील काळामध्ये आर्यन खानच्या प्रकरणामुळे शाहरुख खान बऱ्याच कायदेशीर प्रक्रियांमध्ये अडकला होता. त्यामुळे चित्रपटाचे शूटींग स्थगित करण्यात आले होते. त्यानंतर आता शाहरुख पुन्हा चित्रपटाच्या शूटींगवेळी रुजू होणार आहे.
Shah Rukh Khan is getting ready for the shooting of Pathan movie
त्यासाठी शाहरुख पुन्हा डायट प्लॅन फॉलो करतोय आणि त्याने जिमला जाणे देखील चालू केलेले आहे. शाहरुख खान जवळपास 2 वर्षा नंतर चित्रपटात झळकणार आहे. त्यामुळे शाहरुखच्या चाहत्यांमध्ये त्याच्या या नव्या सिनेमा बद्दल जाम उत्सुकता निर्माण झाली आहे.
शाहरुख खान बड्डे स्पेशल! पाहूया, शाहरुख खान बद्दलच्या माहीत नसलेल्या काही गोष्टी
या चित्रपटानंतर शाहरुख खान याचा साउथ इंडियन अॅक्ट्रेस नयनतारा हिच्यासोबतचा आणखी एक चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. अटलजींच्या प्रोजेक्ट चे चित्रीकरण 2022 मध्ये सुरु होणार आहे. या चित्रपटामध्ये शाहरुख डबल रोल करताना दिसून येणार आहे. तर हा एक अॅक्शन थ्रिलर सिनेमा असणार आहे. या सिनेमामध्ये नयनतारा, सान्या मल्होत्रा, सुनील ग्रोवर हे देखील अतिशय महत्त्वाच्या भूमिकेमध्ये दिसून येणार आहेत. त्याचप्रमाणे तापसी पन्नूसोबतच देखील एका थ्रिलर मूव्हीमध्ये तो दिसणार आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App