वृत्तसंस्था
नवी दिल्ली : जवाहरलाल नेहरू विद्यापीठ अर्थाचे जेएनयु पुन्हा एकदा वादात अडकली आहे. जेएनयु स्टुडंट्स युनियनच्या नावाने काही पत्रके वाटण्यात आली आहेत. त्यामध्ये आज रात्री वादग्रस्त डॉक्युमेंटरी “राम के नाम”चे स्क्रिनिंग ठेवण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.JNU again in controversy, now for documentary screening of ram ke naam
या स्क्रीनिंगसाठी विद्यापीठाच्या संबंधित अधिकाऱ्यांची कोणतीही परवानगी घेण्यात आलेली नाही. हे स्क्रीनिंग बेकायदा आहे. त्यामुळे हे स्क्रीनिंग थांबवून ताबडतोब कार्यक्रम रद्द करावा, अशा सूचना विद्यापीठ प्रशासनाने दिल्या आहेत.
विद्यापीठ प्रशासनाच्या आदेशांना डावलून हे स्क्रिनिंग झाले, तर संबंधित विद्यार्थ्यांचा गट हा कायदेशीर कारवाईस पात्र राहील, असा इशारा देखील विद्यापीठाने संबंधितांना दिला आहे. “राम के नाम” ही आनंद पटवर्धन निर्मित आणि दिग्दर्शित वादग्रस्त डॉक्युमेंटरी आहे. 6 डिसेंबर 1992 रोजी बाबरी मशीद उद्ध्वस्त झाली.
या विषयावर आनंद पटवर्धन यांनी ही डॉक्युमेंट्री बेतली आहे. या डॉक्यूमेंट्री मध्ये बरेचसे वादग्रस्त भाग आहेत. त्यातून सामाजिक सौहार्दला धक्का पोहोचू शकतो, असे विद्यापीठाने प्रतिबंधात्मक आदेश लागू करताना स्पष्ट केले आहे.
अयोध्येत राम मंदिराच्या बाजूने सुप्रीम कोर्टाचा निकाल लागल्यानंतर तेथे मंदिर बांधकाम अंतिम टप्प्यात आले आहे. अशावेळी संबंधित वाद पुन्हा उकरून काढण्याचा काही राजकीय तत्वांचा डावपेच असू शकतो. येत्या काही महिन्यातच उत्तर प्रदेशात विधानसभेच्या निवडणुका आहेत. या पार्श्वभूमीवर देखील हेतूत: जेएनयु स्टुडंट्स युनियन हे डॉक्युमेंटरी स्क्रिनिंग आयोजित केले आहे का? हे पाहणेही महत्त्वाचे आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App