चीनी व्हायरस विरुध्दच्या लढाईत सरकारबरोबरच भारतीय जनता पक्षाची कार्यकर्त्यांची यंत्रणाही लढत आहे. मात्र, कॉँग्रेसने आतापर्यंत किती नागरिकांच्या जेवणाची व्यवस्था केली. किती जणांना रेशन उपलब्ध करून दिलं? किती लोकांच्या समस्या सोडवल्या? हे आधी स्पष्ट करावे, असा सवाल भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते शाहनवाज हुसेन यांनी केला आहे.
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : चीनी व्हायरस विरुध्दच्या लढाईत सरकारबरोबरच भारतीय जनता पक्षाची कार्यकर्त्यांची यंत्रणाही लढत आहे. मात्र, कॉँग्रेसने आतापर्यंत किती नागरिकांच्या जेवणाची व्यवस्था केली. किती जणांना रेशन उपलब्ध करून दिलं? किती लोकांच्या समस्या सोडवल्या? हे आधी स्पष्ट करावे, असा सवाल भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते शाहनवाज हुसेन यांनी केला आहे.
हुसेन म्हणाले.
हुसेन म्हणाले.
निव्वळ चर्चेत राहण्यासाठी राहुल गांधी यांनी वक्तव्य करणं योग्य नाही. त्यांनी जबाबदार विरोधी पक्षाची भूमिका पार पाडावी. काँग्रेसची सत्ता होती त्यावेळी राहुल गांधी यांनी कधी कुठल्या अर्थतज्ज्ञाशी चर्चा केली नाही. आता रघुराम राजन, अभिजीत बॅनर्जी यांच्याशी चर्चा करून जे काही सांगत आहेत त्या सूचना सरकारकडे आधीच आल्या आहेत.
सरकार एकीकडे चीनी व्हायरसच्या संकटाचा सामना करत असताना दुसरीकडे गरीबांना अधिकाधिक मदत पोहोचवण्याच्या कामात आहे. राहुल गांधी जे आरोप करत आहेत ते काँग्रेस शासित राज्यांचे मुख्यमंत्रीही करत नाहीत. केंद्र आणि राज्य सरकारं करोनाविरोधातील लढाई एकजुटी लढत आहेत.
हुसेन म्हणाले, फक्त वक्तव्यं करून आणि संभ्रम निर्माण करून करोना व्हायरस विरोधात लढणार आहात का? आतापर्यंत किती नागरिकांना थेट मदत केली? किती नागरिकांना जेवण दिलं आणि त्यांच्या रेशनची व्यवस्था केली? हे आधी काँग्रेसने स्पष्ट करावं. पण त्याबद्दल एक वाक्यही राहुल गांधी बोलत नाहीत.
Array