विशेष प्रतिनिधी
पुणे : लग्न हा सर्वांच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा असतो. आजकाल लोक मॅट्रिमोनियल साइट्स वर, वर संशोधन, वधूसंशोधन करत असतात. पण हे कधी कधी धोक्याचे ठरू शकते. याचे उदाहरण म्हणजे, बेंगळूर मधील आयटी कंपनीत काम करणाऱ्या पुण्याच्या 28 वर्षीय तरूणीला एका तरूणाने तब्बल 91000 रूपयांना फसविले आहे.
How trustworthy are matrimonial sites? A young man cheated a pune based IT employee for Rs 91,000 on the pretext that his mother was ill
नोव्हेंबर 2020 मध्ये या दोघांची ओळख एका मॅट्रिमोनियल साइट्स वर झाली होती. तेव्हापासून ते दोघे एकमेकांच्या संपर्कात होते. या तरुणाने आपली आई आजारी असल्याचे कारण सांगून तरूणींकडून 91000 रुपये मागितले. तिने त्याला पैसे दिले. काही काळाने तरूणीला जेव्हा लक्षात आले की, अशाच प्रकारे तो अनेक मुलींना फसवतो. तेव्हा तिने त्याच्याकडून आपले पैसे परत मागितले. पण त्याने पैसे परत करण्यास नकार दिला आणि तिचे फोन्स घेण्याचे टाळले आणि तिला ब्लॉक केले. त्यानंतर तिने सांगवी पोलिस स्टेशनमध्ये याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.
दीड कोटींच्या फसवणुकीप्रकरणी शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राविरुद्ध गुन्हा दाखल, मुंबई पोलीस लवकरच चौकशी करणार
पुणे पोलिसांनी मॅट्रिमोनियल साइट्सवर वर आणि वधू संशोधन करताना काळजी घेण्याचे सांगितले आहे. व्हेरिफाईड अकाऊंट असले तरी देखील काळजीही घेतलीच पाहिजे. असे पुणे पोलिसांनी म्हटले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App