वृत्तसंस्था
मुंबई : मुंबई-अलिबाग जलवाहतूक बंद केल्याने प्रवाशांची कुचंबणा होत आहे. ही वाहतूक आजपासून दोन दिवस बंद राहणार आहे. एसटी बससेवाही बंद असल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. Passengers embarrassed by closure of Mumbai-Alibag waterway; Bus strike due to ST strike
मुंबई-अलिबाग या मार्गे दररोज सुमारे साडेतीन हजार जण प्रवास करतात. शनिवार रविवारी प्रवाशांची संख्या आठ ते दहा हजारांपर्यंत पोचते. एकीकडे एसटी कर्मचाऱ्यांचा संप आणि दुसरीकडे जलवाहतूक बंद झाली आहे. प्रवाशांना खाजगी वाहने आणि शेअर टॅक्सीचा वापर करून मुंबई आणि पनवेल गाठण्याची वेळ आली आहे. यामुळे आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.
पगारवाढ मिळूनही अलिबागच्या एसटी कर्मचाऱ्यांनी संप सुरुच ठेवला आहे. त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. दुसरीकडे नौदल सप्ताहामुळे मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया ते मांडवादरम्यानची जलवाहतूक २ ते ४ डिसेंबर अशी तीन दिवस बंद ठेवली आहे. त्यामुळे मुंबईत आणि अलिबागच्या पर्यटकांची दुहेरी कोंडी झाली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App