जगप्रसिद्ध सुएझ कालव्यात ट्रॅफिक जाम, जोरदार वाऱ्याने अवाढव्य जहाज अडकल्याने जागतिक व्यापार ठप्प


विशेष प्रतिनिधी 

कैरो :  ‘एम व्ही एव्हर गिव्हन’ हे जहाज जगप्रसिद्ध सुवेझ कालव्यात तिरके होऊन अडकून पडल्याने या कालव्यातून होणारी वाहतूक ठप्प झाली आहे. हा जगातील अत्यंत महत्त्वाचा जलवाहतूक मार्ग असल्याने या समस्येमुळे जागतिक व्यापारावर परिणाम होण्याचा धोका निर्माण झाला आहे.Accident in Suez cannel stuck the global trade

एव्हर गिव्हन हे जहाज ४०० मीटर लांब असून ५९ मीटर रुंद आहे. या जहाजावर सध्या २० हजार कंटेनर आहेत. जहाजाचे वजन दोन लाख २० हजार टन आहे.सुमारे दहा वर्षे खोदकाम करत तयार केलेल्या सुएझ कालव्यामधून १८६९ पासून जलवाहतूक सुरु आहे. पाश्चिसमात्य देशांना तेल, नैसर्गिक वायू आणि इतर मालाचा या कालव्यातून पुरवठा होता. जगातील एकूण सागरी व्यापारापैकी १० व्यापार याच कालव्यातून होतो.

‘एव्हर गिव्हन’ हे पनामा देशाचे मालवाहतूक जहाज आहे. यातून आशिया आणि युरोपदरम्यान सामानाची ने-आण केली जाते. हे जहाज तिरके होऊन अत्यंत अरुंद असलेल्या कालव्याच्या किनाऱ्यावर फसून बसले. या जहाजाने लाल समुद्रातून सुएझ कालव्यात प्रवेश करताच जोरदार वाऱ्यांमुळे ते कलंडले.

जहाजातून एकही कंटेनर खाली पडला नसला तरी जहाज रुतून बसल्याचे एव्हरग्रीन मरीन या तैवानमधील कंपनीने सांगितले. इजिप्तच्या अधिकाऱ्यांनी अधिकृत प्रतिक्रिया दिली नसली तरी एका अधिकाऱ्यानेही वाऱ्यांमुळेच ही घटना घडल्याचे सांगितले.

जहाज कालव्यात शिरले त्यावेळी ५० किमी प्रतितास या वेगाने वहात होते. हा कालवा अत्यंत अरुंद असल्याने पूर्ण मार्ग अडवून फसलेल्या या जहाजामुळे इतर अनेक जहाजे अडकून पडली आहेत.

Accident in Suez cannel stuck the global trade

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती