विशेष प्रतिनिधी
मुंबई : राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. आता वैमानिकांनीही काम बंद आंदोलनाचा इशारा दिला आहे. वारंवार विनंती करूनही वैमानिकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष केले जात असल्याने एअर इंडियाच्या वैमानिकांनी कंपनीला शेवटचा अल्टिमेटम दिला आहे. मागण्या मान्य करा; अन्यथा कामबंद आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.Pilots threatened to stop working, last ultimatum to Air India
वैमानिकांच्या संघटनांनी यासंदर्भात विमान वाहतूक मंत्रालयाचे सचिव राजीव बन्सल यांना पत्र लिहून मागण्या मांडल्या आहेत. कोरोनाकाळात सर्वच विमान कंपन्यांनी वेतनकपात लागू केली; परंतु हवाई वाहतुकीत सुधारणा झाल्यानंतर खासगी कंपन्यांनी त्यांच्या वैमानिकांना पूर्ण वेतन देण्यास सुरुवात केली.
एअर इंडियाने मात्र अद्यापही कपात थांबविलेली नाही. त्यामुळे ५५ टक्के कपातीचा भार सहन करावा लागत आहे. वेतन पूर्ववत करण्यासंदर्भात वारंवार पत्रव्यवहार केल्यानंतरही एअर इंडियाच्या व्यवस्थापनाकडून दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे कामबंद केल्याशिवाय आमच्यासमोर कोणताही पर्याय उरलेला नाही, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे.
कंपनीने बेकायदेशीरपणे ५५ टक्के वेतनकपात लागू केली आहे. ती तत्काळ मागे घेण्यात यावी. वैमानिकांची व्याजासह रोखलेली २५ टक्के थकबाकी, ग्रॅच्युइटीचे विवरण, रजा रोखीकरणाचा पर्याय, सर्व कायम कर्मचाऱ्यांसाठी वैद्यकीय लाभ, रोखलेल्या लेओव्हर भत्त्यावर कर सवलत लागू करावी, अशी मागणी केली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App