वृत्तसंस्था
तिरुअनंतपुरम : स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या टीकाकारांनी हे विसरू नये की ते प्रथम अभिजात क्रांतिकारक होते. देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी अविरत कष्ट भोगले. त्यांच्या विचारांची मतभेद असू शकतात परंतु त्यांना पूर्णपणे नाकारणे सर्वस्वी गैर आहे, असे प्रतिपादन केरळचे राज्यपाल अरिफ मोहम्मद खान यांनी केले आहे.Savarkar’s critics should not forget that he was an elite revolutionary
भारतात सावरकर युग सुरू झालेय, भारतरत्नपेक्षाही त्यांचे व्यक्तीमत्व मोठे, केंद्रीय माहिती आयुक्त उदय माहूरकर यांचे प्रतिपादन
भारताचे माहिती आयुक्त उदय माहुरकर आणि चिरायू पंडित यांनी लिहिलेल्या “सावरकर द मॅन हू कूड प्रिंटेड द पार्टिशन” या पुस्तकाचे प्रकाशन केल्यानंतर आरिफ मोहम्मद खान बोलत होते. आरिफ मोहम्मद खान म्हणाले, की सावरकर हे फक्त सशस्त्र क्रांतिकारकच नव्हते तर सामाजिक क्रांतीच्याही अनेक गोष्टी त्यांनी केल्या. भारतातल्या अस्पृश्यतेविरुद्ध आवाज उठवणारे गांधीजींच्या आधी सावरकर हेच पहिले नेते होते. रत्नागिरी त्यांनी केलेले अस्पृश्यता निवारणाचे कार्य अजोड आहे.
देशात भिन्नभिन्न विचारधारा आहेत. त्या सर्वांचा अभ्यास विद्यार्थ्यांनी केला पाहिजे. त्यात परस्पर विरोध असला तरी या विचार प्रणालींमध्ये भारतीय राष्ट्रीयत्वाचा एक अतूट धागा पण आहे आणि तो धागा आपल्याला मजबूत करायचा आहे, याची आठवण देखील आरिफ मोहम्मद खान यांनी यावेळी करुन दिली. लेखक धुळे उदय माहुरकर आणि चिरायू पंडित यांनीदेखील आपली मनोगते व्यक्त केली.
सावरकरांचा संरक्षण विषयक आणि परराष्ट्र धोरण विषयक विचार आता भारतात रुजत चालला आहे. भारत प्रबळ राष्ट्र झाल्याशिवाय त्याला आंतरराष्ट्रीय पातळीवर खऱ्या अर्थाने अधिमान्यता मिळणार नाही, या सावरकरांच्या विचारावर देश पुढे चालला आहे, असे प्रतिपादन उदय माहुरकर यांनी केले. सावरकरांचे व्यक्तिमत्व आणि विचार हे भारतरत्न किताबाच्या पलीकडचे आहेत, असे चिरायु पंडित यांनी सांगितले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App