वृत्तसंस्थ
मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन आझाद मैदानावर सुरूच आहे. दुसरीकडे आजपासून कामावर हजार झाला नाही तर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा सरकारने दिला आहे. दरम्यान, १८ हजार जण कामावर परतले असून राज्यात ९३७ बस धावल्या आहेत. ST Workers Strike: Strict action against contact ST workers from today
एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे, या मागणीसाठ एसटी कर्मचारी संपावर ठाम आहेत. ४१ टक्के पगारवाढ मिळाल्यानंतरही संप मागे घेतलेला नाही. त्यामुळे सरकारने आता कठोर कारवाई केली जाईल, असा परिवहनमंत्री अनिल परब यांनी इशारा दिला. आज म्हणजे रविवारपासून कडक कारवाई सुरू होणार असल्याचे वृत्त आहे.
दरम्यान, कारवाईच्या भीतीने ६ हजार कामगार शनिवारी कामावर रुजू झाले. त्यामुळे कामावरील कामगारांची संख्या १८ हजारांवर गेली आहे. त्यामुळेच शनिवारी राज्यात ९३७ बस धावल्या. काही ठिकाणी बसवर दगडफेक झाली.काही डेपोंबाहेर निदर्शने झाली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App