वृत्तसंस्था
मुंबई : कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रासह गुजरातमध्ये पुन्हा पावसाची शक्यता आहे, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. ३० नोव्हेंबर ते १ डिसेंबर दरम्यान पावसाची शक्यता आहे. Rains likely in Konkan, Goa, Central Maharashtra and Gujarat; Weather forecast
अंदमान निकोबार बेटाच्या परिसरात आज कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. त्याचा परिणाम होत असून कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात पावसाच्या जोरदार सरी कोसळतील, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
तामिळनाडू आणि दक्षिणेकडील राज्यात जोरदार पावसाने अगोदरच हाहाकार उडविला आहे. पुरामुळे चैनई सारख्या शहरांची दैना उडाली आहे. त्यात आता पुन्हा पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तविला आहे.
एकंदरीत सध्या थंडीचे दिवस असूनही अचानक कोठे ना कोठे पाऊस पडत आहे. हवामानात बदल होत असल्याने नेमका कोणता ऋतू आहे, हे जनतेला समजेनासे झाले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App