विशेष प्रतिनिधी
बुऱ्हाणपूर : प्रेमाचं प्रतीक असणारे, जगातील सात आश्चर्यांपैकी एक म्हणजे ताजमहल होय. आग्रा येथे वसलेले ताजमहल सुरुवातीला मध्य प्रदेशमधील तापी नदीच्या किनारी बांधण्यात येणार होते. नंतर शाहजहानने हा प्लॅन बदलला आणि ताजमहल आगरामध्ये बांधण्यात आले. शहाजहानने आपली पत्नी मुमताजच्या आठवणींमध्ये ताजमहल बांधला होता. मुमताज हिचे निधन बुरहानपूर मध्यप्रदेश येथे झाले होते.
A citizen of Burhanpur built a house that looked like the Taj Mahal as a gift for his wife
हे सर्व सांगण्याचा उद्देश असा की, बुरहानपूर मध्यप्रदेश मधील नागरिक आनंद चोकसे यांनी आपल्या पत्नीसाठी गिफ्ट म्हणून ताजमहल सारखेच दिसणारे घर बांधले आहे. 4 बेडरूम असलेले हे घर एक्झॅक्टली ताज्या ताजमहाल सारखे आहे. हे घर बांधण्यासाठी एकूण 3 वर्ष लागली.
हे घर बांधणारे इंजिनीयर म्हणतात की, हे घर बांधण्यासाठी प्रचंड अडचणींचा सामना करावा लागला. त्यासाठी सुरुवातीला ताजमहालचे परीक्षण करावे लागले. त्यानंतरच बऱ्याच इंजिनीअर्सच्या मदतीने हे घर बांधण्यात आले आहे. बंगाल आणि इंदोर मधील कलाकारांनी या घराचे आतील नक्षीकाम केले आहे. तर या घराचे डोम 29 feet उंच आहे. या घराच्या फरशाही हुबेहूब ताजमहाल मधील फरश्यांसारख्या आहेत. ज्या राजस्थानमधील मकराणा इथून बनलेल्या आहेत. तर मुंबईमधल्या कलाकारांनी येथील फर्निचरचे काम केले आहे.
ताजमहाल पाहण्यासाठी आता पर्यटकांना मोजावे लागतील अधिक पैसे; तिकीट दरात मोठी वाढ
या पूर्ण घरामध्ये 2 बेडरूम खाली आणि 2 बेडरुम वर, एक लायब्ररी रूम, एक मेडिटेशन रुम आहे. तर घराच्या आतील आणि बाहेरील बाजूस लायटिंग केलेले आहे. जसे ताजमहाल उठून दिसते तसेच हे घर देखील संपूर्ण बुरहानपूर मध्ये उठून दिसावे हा उद्देश यामागे आहे. सध्या इंटरनेटवर या घराचे फोटो प्रचंड वेगाने व्हायरल होताना दिसून येत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App