प्रतिनिधी
नवी दिल्ली : कोणत्याही निवडणुका आल्या की मंदिरांच्या पायऱ्या झिजवणाऱ्या काँग्रेस नेत्यांवर काँग्रेसचे पंजाब मधले खासदार मनीष तिवारी यांनी वार केला आहे. धर्म ही वैयक्तिक बाब आहे. राजकारणाचा आधार नाही. काँग्रेसच्या नेत्यांनी हे समजून घेतले पाहिजे, अशा शब्दात त्यांनी काँग्रेस नेत्यांच्या सॉफ्ट हिंदुत्व भूमिकेवर प्रहार केला आहे.Congress MP manish tiwari targets. Congress leaders over soft Hindutva
पंजाब मध्ये 13 लोकसभा मतदारसंघ आहेत. त्यापैकी फक्त एका मतदारसंघातून हिंदू खासदार निवडून आला आहे आणि तो मी आहे. माझी आई शीख आणि वडील हिंदू. परंतु माझ्यावर पंजाबीयतचे संस्कार झाले आहेत. त्यामुळे मी पंजाबीयत असलाच मानतो. माझे आडनाव उत्तर प्रदेश किंवा बिहारी असूनही जनतेने मला पंजाबीयतच्याच भूमिकेतून स्वीकारले आहे. मी गुरुदासपूर मधून आणि आनंदपूर साहिब मधून निवडून आलो. माझ्यावर उत्तर प्रदेश किंवा बिहारचा शिक्का मारण्याचा प्रयत्न झाला. परंतु विरोधकांना ते जमले नाही. कारण मी पंजाबीयत मानतो, अशा शब्दांमध्ये मनीष तिवारी यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
केंद्र सरकार देशातील तरुणांना ड्रग्जमध्ये झोकून देण्याचा प्रयत्न करतंय, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा गंभीर आरोप
निवडणुका जवळ आल्या की काँग्रेसचे अनेक नेते प्रत्येक गावातल्या मंदिरांमध्ये जाऊन पूजाअर्चा करतात. या विषयावर देखील त्यांनी परखड मत व्यक्त केले आहे. देश स्वतंत्र झाला तेव्हा गांधीवादी मानवतावाद आणि नेहरूवादी बहुलतावाद या दोन राजकीय प्रणाली होत्या. गांधीजींची हत्या झाल्यानंतर देशात पंडित नेहरूंच्या बहुलतावादाला प्राधान्य मिळाले. त्यामध्ये धर्म ही वैयक्तिक बाब राहिली. त्याचा राज्य चालवण्याची काहीही संबंध राहिला नाही. काँग्रेसच्या राजकारणाचा हा मूळ आधार आहे. धार्मिक पूजाअर्चा हा काँग्रेसच्या राजकारणाचा आधार नाही, हे काँग्रेसच्या सर्व नेत्यांनी समजून घेतले पाहिजे, अशा शब्दांमध्ये मनीष तिवारी यांनी आपल्याच पक्षाच्या नेत्यांना कानपिचक्या दिल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App