केंद्र सरकार देशातील तरुणांना ड्रग्जमध्ये झोकून देण्याचा प्रयत्न करतंय, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा गंभीर आरोप


केंद्र सरकारने दोन कोटी युवकांना नोकर्‍या देण्याचे आश्वासन दिले, मात्र त्यानंतर जे नोकरीला होते त्यांनादेखील घरी पाठवण्याची व्यवस्था केली. केंद्र सरकारने समुद्रातले पोर्ट खासगी करून आपल्या मित्रांना देऊन त्यांच्या पोर्टच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात ड्रग्ज आणले गेलेत. गुजरातच्या पोर्टवर एकवीस हजार कोटींचे ड्रग्ज मिळाले, अशा अनेक घटना घडल्या. हे केंद्र सरकार देशातल्या तरुणांना ड्रग्जमध्ये झोकून देण्याचा प्रयत्न करतेय, असा आरोप नाना पटोले यांनी भाजपवर केला. Central government is trying to lure the youth of the country into drugs, serious allegations by Congress state president Nana Patole


वृत्तसंस्था

कल्याण : केंद्र सरकारने दोन कोटी युवकांना नोकर्‍या देण्याचे आश्वासन दिले, मात्र त्यानंतर जे नोकरीला होते त्यांनादेखील घरी पाठवण्याची व्यवस्था केली. केंद्र सरकारने समुद्रातले पोर्ट खासगी करून आपल्या मित्रांना देऊन त्यांच्या पोर्टच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात ड्रग्ज आणले गेलेत. गुजरातच्या पोर्टवर एकवीस हजार कोटींचे ड्रग्ज मिळाले, अशा अनेक घटना घडल्या. हे केंद्र सरकार देशातल्या तरुणांना ड्रग्जमध्ये झोकून देण्याचा प्रयत्न करतेय, असा आरोप नाना पटोले यांनी भाजपवर केला.



पटोले पुढे म्हणाले की, एमपीएससीसाठी जवळपास अडीच लाख विद्यार्थ्यांचे अर्ज प्राप्त झाले आहेत, गेल्या सहा-सात वर्षांत बेरोजगारी वाढल्याने जिथे संधी मिळेल त्या संधीला तरुण शोधत असतात, शासनाच्या रिक्त असलेल्या जागा भरण्याच्या दृष्टिकोनातून शासनाने तत्काळ पावले उचलली पाहिजेत, कोरोना काळात अनेकदा या विद्यार्थ्यांच्या परीक्षा नाकारल्या गेल्यात त्यामुळे एमपीएससी परीक्षेचे वेळापत्रक बनवताना त्या परीक्षा वेळेवर घेण्यात याव्यात व वेळेवर रिक्त जागा भरण्यात याव्यात, अशी मागणी काँग्रेसतर्फे राज्य सरकारकडे करण्यात येणार असल्याचेही पटोले यांनी सांगितले.

एसटी संपावर बोलताना ते म्हणाले की, भाजपने एसटी कामगार संघटनेच्या खांद्यावर बंदूक ठेवून राज्यातलं वातावरण खराब करण्याचा प्रयत्न केलाय, एकीकडे केंद्रात सगळ्या सार्वजनिक व्यवस्था या खासगीकरणाकडे चालल्यात आणि इथे राज्यात सांगतात की, आम्हाला शासनात विलीनीकरण करा ही बीजेपीची दुटप्पी भूमिका आहे. काँग्रेस त्यांच्यासाठी प्रयत्न करेन त्यांना न्याय मिळवून देईन, मात्र भाजपच्या मानसिकतेने एसटी कामगार वागत आहेत ते बरोबर नाही, त्यांनी संप मागे घ्यावा, सरकारशी चर्चा करावी, आम्ही त्यांच्या बरोबर आहोत, असंही ते म्हणाले.

Central government is trying to lure the youth of the country into drugs, serious allegations by Congress state president Nana Patole

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात