ताजमहाल पाहण्यासाठी आता पर्यटकांना मोजावे लागतील अधिक पैसे; तिकीट दरात मोठी वाढ

वृत्तसंस्था

आग्रा : जगप्रसिद्ध ताजमहाल पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना आता तिकिटासाठी जादा रक्कम मोजावी लागणार आहे. देशी आणि परदेशी पर्यटकांच्या तिकीट दरात आता वाढ केली गेली आहे. Tourists will now have to pay more to see the Taj Mahal; Big increase in ticket prices

ताजमहालच्या प्रवेश तिकिटासाठी भारतीय पर्यटकांना 50 ऐवजी 80 रुपये तर परदेशी पर्यटकांना 1100 ऐवजी 1200 रुपये मोजावे लागणार आहेत. ताजच्या प्रमुख इमारतीत प्रवेश करण्यासाठी भारतीय पर्यटकांना 200 ऐवजी 480 रुपये आणि परदेशी पर्यटकांना 1600 रुपये मोजावे लागतील.या तिकीट दरवाढीवर प्रतिक्रिया पर्यटक सौरभ मिश्रा यांनी नाराजी व्यक्त केली. दरवाढीमुळे भारतीय पर्यटकांची संख्या रोडावण्याची शक्यता आहे. प्रवेश तिकीट 50 रुपयेच योग्य होते. त्यात वाढ करणे अयोग्य आहे.

Tourists will now have to pay more to see the Taj Mahal; Big increase in ticket prices

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*