विशेष प्रतिनिधी
झांशी : पूर्वीच्या सरकारांनी बुंदेलखंडला केवळ लुटण्याचे काम केले. लुटण्यापासून ते कधी थकले नाही. आम्ही मात्र विकासकामे करताना थकणार नाही असा हल्लाबोल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला.Former governments looted Bundelkhand, criticizes Prime Minister Narendra Modi
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशातील झांशी आणि महोबा येथील सुमारे ६ हजार ७०० कोटी रुपयांच्या विविध योजनांचे उद्घाटन आणि भूमिपूजन केले. मोदींनी झांशीची राणी लक्ष्मीबाई यांना वंदन करून सांगितले, की राणी लक्ष्मीबाई यांच्याकडे इंग्रजांप्रमाणे संसाधने असती तर आज देशाचा इतिहास वेगळा असता.
बुंदेलखंडचे वीर आल्हा-उदल तसेच हॉकीचे जादूगर मेजर ध्यानचंद यांनाही मोदींनी वंदन केले. मोदी म्हणाले, की यापूर्वीच्या सरकारांनी बुंदेलखंडला केवळ लुटण्याचे काम केले. ते लुटमार करून थकले नाही आणि आम्ही विकास कामे करताना कधी थकणार नाही.
झांशीमध्ये ६०० मेगावॅट क्षमतेच्या अल्ट्रा सौर उर्जा पार्कचे भूमिपूजन केले. यासाठी सुमारे ३ हजार कोटी रुपये खर्च होणार आहेत. तसेच डिफेंस इंडस्ट्रियल कॉरिडोरच्या झांशी नोडमधील ४०० कोटी रुपयांच्या योजनेचेही त्यांनी भूमिपूजन केले. तर महोबा येथे ३ हजार २०० कोटी रुपयांची अर्जून सहायक योजना, रतौली आणि भवानी धरण तसेच मझगाव-चिल्ली स्प्रिंकलर सिंचन योजनांचे लोकार्पण मोदींनी केले.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App