नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कार्तिक पौर्णिमा गुरुनानक जयंती प्रकाश पर्व यानिमित्ताने तीन कृषी कायदे रद्द करण्याची घोषणा केल्यानंतर देशातल्या सगळ्या मोदी विरोधकांना आनंदाची उकळी फुटली आहे. ते स्वाभाविकच आहे कारण मोदींनी एक पाऊल मागे घेतले आहे. Vajpayee’s “that” speech, Modi’s “that” speech !!; Do supporters and opponents have any idea … ??
मोदींच्या आजच्या भाषणाचा टोन लक्षात घेतला आणि ते भाषण नीट ऐकले तर 1996 च्या विश्वासदर्शक ठरावावरचे तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे शेवटचे भाषण आठवल्याशिवाय राहत नाही. वाजपेयी त्यावेळी काय म्हणाले होते??, “लोगोने हमे जीता कर पार्लमेंट भेजा है. संख्या में हम थोडे कम रहे गये है. सदन की संख्याबल के सामने हम अपना सर झुकाते है. लेकिन हम वादा करते है की हम जनता की सेवा मे फिर एक बार जुट जायेंगे और बहुमत लेकर वापस आयेंगे. वाजपेयींच्या त्या भाषणामध्ये सुद्धा केवळ लोकसभेतल्या संख्याबळापुढे झुपण्याचे वक्तव्य होते. त्यानंतरचा इतिहास सर्वज्ञात आहे त्यानंतर 2004 पर्यंतच्या प्रत्येक निवडणुकीत भाजपचे संख्याबळ वाढताना दिसले आहे. इतकेच नाही तर त्यानंतर सव्वा वर्षाचा अपवाद वगळता सहा वर्षे वाजपेयी हेच देशाचे पंतप्रधान राहिले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आजचे भाषण ऐकताना वारंवार वाजपेयी यांच्या “त्या” भाषणाची आठवण होत होती. मोदींनी सुद्धा आजच्या भाषणात वाजपेयींच्या पावलावर पाऊल टाकत “एक पाउल आम्ही मागे घेतो कृषी कायदे रद्द करत आहोत. शेतकऱ्यांना आम्ही समजवू शकलो नाही. आमच्या तपश्चर्येचे बळ कमी पडले. आमच्या उणिवा आम्ही भरून काढू. आम्ही पुन्हा नव्याने सुरुवात करू. खरे म्हणजे आपण पुन्हा नव्याने सुरुवात करू, असे आवाहन मोदींनी केले आहे. मोदींच्या या आवाहनातच वाजपेयींच्या “त्या” भाषणाची खरी मेख आहे…!! वाजपेयी यांनी त्यावेळी भाषण करून भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये आत्मविश्वासाचा दम भरला होता.
मोदींनी देखील आज पंजाब आणि उत्तर प्रदेश निवडणुकीच्या मार्गातला एक मोठा अडथळा दूर करून खऱ्या अर्थाने विरोधकांकडे एक नवा मुद्दा शोधण्याचा राजकीय पेच टाकला आहे.
विरोधकांना आज आनंदाची उकळी फुटली आहे पण उकळीचे एक वैशिष्ट्य असते उकळी कधी कायम राहत नाही. ती फुटून शांत होते आणि नंतर थंडावत जाते. त्यामुळे विरोधकांनी आज जरी “अहंकार का सर झुक गया”, असे ट्विट केले असले तरी देखील मोदींनी अत्यंत चाणाक्षपणे कृषी कायद्यांच्या मुद्द्यांवर एकच पाऊल मागे घेतले आहे.
नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्याच्या नव्या घोषणेतून त्यांनी आपली दिशा बदलल्याचेही दिसत आहे पण विरोधकांच्या डोळ्यांपुढे मोदींच्या माघार घेतलेल्या पावलाचे पडळ आल्यामुळे त्यांना मोदींची ही चलाखी दिसत नाही. नैसर्गिक शेतीद्वारे संपूर्ण कृषी पॅटर्न बदलण्याचा मोदी घालू शकतात हे त्यांच्या लक्षात येत नाही. त्यामुळे ही लढाई एका भाषणात पुरती मर्यादित नाही. एका माघारीच्या पावलाची नाही, ती दीर्घकाळची लढाई आहे आणि तिथे मोदी विरोधकांना पुरे पडतात? की विरोधक मोदींना पुरे पडतात?हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे…!!
वाजपेयींच्या 1996 च्या विश्वासदर्शक ठरावाच्या अंतिम भाषणाने त्यावेळी देशाच्या राजकारणाची दिशा निश्चित केली होती. मोदींनी आजच्या भाषणातून हाच प्रयत्न केल्याचे दिसत आहे…!!
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App