नागरिकांचे सकाळी 9 ते रात्री 9 यावेळेत कोविड लसीच्या पहिल्या व दुसऱ्या डोसकरीता ऑनस्पॉट रजिस्ट्रेशनद्वारे लसीकरण करण्यात येणार आहे. Kolhapur: Citizens who do not have identity cards will also be vaccinated
विशेष प्रतिनिधी
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात आज शुक्रवारी (ता. 19) 18 वर्षावरील नागरिकांचे लसीकरण होणार आहे.कोल्हापूर जिल्हा आरोग्य विभाग व जिल्हा प्रशासनाच्या वतीने विशेष कोविड लसीकरण मोहिमेचे आयोजन केलेले आहे.यामध्ये ज्या नागरीकांकडे आधार कार्ड, पॅनकार्ड, किंवा कोणतेही ओळखपत्र/ कागदपत्र नाही अशा बेघर, भटक्या, फिरस्ती, मजूर, कामगार इत्यादी नागरिकांचे लसीकरण होणार आहे.
नागरिकांचे सकाळी 9 ते रात्री 9 यावेळेत कोविड लसीच्या पहिल्या व दुसऱ्या डोसकरीता ऑनस्पॉट रजिस्ट्रेशनद्वारे लसीकरण करण्यात येणार आहे.जिल्हा प्रशासनाच्या वतीने ओळखपत्र नसलेल्या नागरिकांना लसीकरण करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व यंत्रणेने सहभागी व्हावे. जिल्ह्यातील सामाजिक संस्थांनी यासाठी विशेष प्रयत्न करावेत व जास्तीत जास्त गरजू लाभार्थीचे माहिती देऊन त्यांचे लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
दरम्यान ज्या नागरिकांकडे ओळखपत्र नाही, अशा नागरिकांनी जवळपासच्या आरोग्य केंद्राशी संपर्क करावा. अधिक माहितीसाठी स्थानिक आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक, तलाठी, पोलिस पाटील, शिक्षक या शासकीय अधिकारी/ कर्मचारी यांच्याकडून माहिती घ्यावी, असे सांगण्यात आले.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App