तुमची भाषा आणि विधानं आदिवासी समाजात फूट पाडणारी ; फडणवीसांनी शरद पवारांना लगावला टोला

गडचिरोली जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्ता मेळाव्यात शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या केलेल्या भाषणावरून टीका केली होती.Your language and statements are divisive in tribal society; Fadnavis attacked Sharad Pawar


विशेष प्रतिनिधी

मुंबई : पंतप्रधान मोदींच्या एका व्हिडिओवर शरद पवारांनी दिलेल्या प्रतिक्रियेवरुन फडणवीसांनी पवारांवर ट्विटद्वारे जोरदार निशाणा साधला आहे.यावेळी फडणवीस म्हणाले की , “आदिवासी समाजात फूट पाडणारी तुमची भाषा आणि विधानं आहेत.”

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार चार दिवसीय विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत.त्यांनी गडचिरोली जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्ता मेळाव्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या केलेल्या भाषणावरून टीका केली होती.



फडणवीस ट्विट करत म्हणाले, तुमच्यासारख्या मोठ्या नेत्यांना तथ्ये आणि नेमकी माहिती असायला हवी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात जनजाती आणि आदिवासी हे शब्द वापरले आहेत. तुम्ही दावा केल्याप्रमाणं त्यांनी शब्द वापरलेले नाहीत.

नेमक काय म्हणाले होते शरद पवार

काल शरद पवारांनी गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज तालुक्यातील कार्यकर्ता आणि पदाधिकारी बैठकीस संबोधित केले. यावेळी बोलताना शरद म्हणाले की, ‘आज देशाची सूत्रे भाजपकडे आहेत. दोन दिवसांपूर्वी भोपाळ येथे आदिवासी संमेलन झाले होते. तिथे पंतप्रधान नरेंद्र मोदीही उपस्थित होते.

पुढे शरद पवार म्हणाले की , पण मला आश्चर्य वाटलं, तिथे कुठेही त्यांनी आदिवासी हा शब्द वापरला नाही. त्याऐवजी वनवासी असा शब्द मोदींनी वापरला. दरम्यान वनवासी हा शब्द आदिवासींना मंजूर नाही. आम्ही मूलनिवासी आहोत, त्यामुळे आम्हाला वनवासी म्हणू नका, असे आदिवासी समाजाचे म्हणणे आहे, असं देखील पवार म्हणाले होते.

Your language and statements are divisive in tribal society; Fadnavis attacked Sharad Pawar

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात